Solid Joys

6   June : सर्वच देवाचे वैरी


Listen Later

जे तुम्हीं पूर्वी परके व दुष्कर्मे करत मनानें वैरी झाला होता, 'त्या तुमचा आता त्यानें स्वतःच्या रक्तमांसाच्या देहात मरणाच्या द्वारें समेट केला आहे, ह्यासाठीं कीं त्यानें तुम्हांला पवित्र, निष्कलंक व निर्दोष असें आपणासमोर उभे करावे. (कलसै 1:21-22)

 जगातील सर्वात चांगली बातमी ही आहे कीं देवा बरोबर असलेंला आमचा परकेपणा व वैर संपलेलें आहे आणि आता आपला या विश्वाच्या न्यायाधीशा सोबत समेट झाला आहे. देव आता आपल्यां विरुद्ध नाहीं तर, आपल्यां सोबत आहे. सर्वसमर्थाची प्रीति आपल्यां बाजूनें असल्यानें आपल्यां आत्म्याला कवच प्राप्त होते. जीवन हे स्वतंत्र आणि धाडसी बनते जेव्हां विश्वातली सर्वात सामर्थ्यवान व्यक्ती आपल्यां बाजूनें असतो.

पण जे कलस्सै 1:21 मध्यें सांगण्यांत आलेलें रोग-निदान नकारतात, पौलाचा तारणाचा संदेश त्यांच्यासाठीं चांगली बातमी नाहीं. तो म्हणतो, "तुम्हीं परके व दुष्कर्मे करत मनानें वैरी झाला होता."

तुम्हीं अशा किती लोकांना ओळखता जे असें म्हणतात कीं, "मजवर जर देवानें कृपा केली नाहीं तर मग मी मनानें देवाचा वैरी आहे"? , "मी देवाचा द्वेष करतो. असें क्वचितच लोक म्हणतात. मग पौलाचे काय म्हणणें आहे जेव्हां तो म्हणतो कीं येशूच्या रक्ताद्वारें समेट होण्यापूर्वी सर्व लोक"देवाचे वैरी आहेत"?

मला वाटते कीं खर्‍या देवाबद्दल लोकांच्या मनात वैर आहे, पण लोक खर्‍या देवाचा विचार करण्याचा प्रयत्न करत नाहींत. त्यांना वाटते कीं देव अगदी त्यांच्या कल्पनेंप्रमाणें आहे, ज्या मध्यें आपण देवाचे वैरी आहोत असा विचार त्यांना क्वचितच पडत असेल.

पण खरा देव जो अस्तित्वात आहे त्याच्याविषयीं विचार करायचा झाल्यास - तो देव जो सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवतो, आजार आणि आपत्तीवर ही -आपण सर्व त्याचे वैरी होतो, पौल म्हणतो आपण मनानें त्याचे सामर्थ्य आणि अधिकार याचा द्वेष करत होतो.

आणि जे आपलें तारण झालें आहे ते या अढ्भुत सत्यामुळें कीं ख्रिस्तानें त्याच्या मरणानें आम्हांसाठीं कृपा प्राप्त केलीं आहे ज्या द्वारें देवानें आपल्यां मनाचा ताबा घेतला आणि एकेकाळी ज्याचा आपण द्वेष करत होतो, ते आपण आता त्याच्यावर प्रीति करण्यास प्रवृत्त झालो.

आज पुष्कळ लोग असें आहेत जें देवाबरोबर आपलें कसेही वैर नसावे हे शिकत आहेत. हे चांगलें आहे कीं तो एक असा रोगी आहे ज्याच्या वाट्याला शेवटी गौरव आहे.

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

Solid JoysBy Alethia4India