Solid Joys

8 December : बेथलेहेमचा तो अलौकिक तारा


Listen Later

“यहूद्यांचा राजा जन्मास आला तो कोठे आहे? कारण आम्हीं पूर्व दिशेस त्याचा तारा पाहून त्याला नमन करण्यास आलो आहोत.” (मत्तय 2:2)

काही गोष्टी कशा घडतात याविषयी बायबल आम्हांला कुतूहलाने केवळ बुचकळ्यात पाडते. हा “तारा” मागी लोकांस पूर्वेहून यरूशलेमास कसा घेऊन आला?

वचन असे म्हणत नाहीं कीं त्यानें यरूशलेमेच्या दिशेनें त्यांचे मार्गदर्शन केलें अथवा त्यांच्या पुढे पुढे यरूशलेमास चालत गेला. वचन केवळ इतके म्हणते कीं त्यांनी पूर्व दिशेस तारा पाहिला (मत्तय 2:2) आणि ते यरूशलेमास आलें. आणि मत्तय 2:9 सांगते त्याप्रमाणें त्यां ताऱ्याने त्यांच्यापुढे यरूशलेमाहून बेथलेहेमापर्यंत लहानसे पाच मैलांचे अंतर कसे व्यापले? तो तारा नेमका “जेथे तो बालक होता, त्या जागेच्या वर जाऊन” कसा थांबला?

उत्तर हे आहे : आम्हांला माहीत नाहीं. ग्रहांचा संगम किंवा धूमकेतू किंवा सुपर नोवा किंवा अद्भुत प्रकाश या संदर्भात त्याचे स्पष्टीकरण करण्याचे अनेक प्रयत्न झालेंले आहेत. आम्हांला मुळीच माहीत नाहीं. आणि मी तुम्हांला प्रोत्साहन देऊ इच्छितो कीं त्यात गुंतून राहू नका - शेवटी केवळ तात्पुरत्या असणाऱ्या आणि फार कमी आत्मिक महत्व असलेल्या सिद्धांतांवर खिळून राहू नका.

मी तुम्हांला ताकीद देण्यासाठीं सामान्यीकरणाचा धोका पतकरतो : जे लोक अशा गोष्टींचा अभ्यास करतात आणि त्यात गुंतून राहतात, जसे ताऱ्याने कसे काम केलें आणि तांबडा समुद्र कसा विभागला आणि मन्ना कसा पडला आणि योना मत्साच्या पोटातून कसा वाचला आणि चंद्र कसा रक्तबंबाळ होतो, सामान्यतः असे लोक आहेत ज्यांच्याजवळ अशी मानसिकता आहे ज्यास मी अत्यल्प मानसिकता म्हणतो.

तुम्हांला त्यांच्या लेखनांत सुवार्तेच्या थोर केंद्रिय सत्याची सखोल सत्यें दिसणार नाहींत : असें कीं, देवाचे पावित्र्य, पापाची कुरूपता, मनुष्याची लाचारी, ख्रिस्ताचा मृत्यू, केवळ विश्वासाने नीतिमान ठरणें, आत्म्याचे पवित्र करणारे कार्य, ख्रिस्ताचे वैभवाने पुनरागमन, आणि शेवटचा न्याय. असें लोक नेहमीच तुम्हांला कुठल्यातरी नवीन लेखाने अथवा पुस्तकाने दुसऱ्या मार्गास नेण्याचा प्रयत्न करतात ज्याचे कुठल्यातरी सीमित गोष्टीने वर्णन करण्याविषयी ते अतिशय उत्साहित असतात. त्यांना महान आणि केंद्रिय अशा सत्यांनी इतका आनंद होत नाहीं.

पण ताऱ्याच्या या बाबीविषयी हे स्पष्ट आहे कीं तो असे काही करीत होता जे तो स्वतःहून करू शकत नव्हतां : तो मागी लोकांस देवाच्या पुत्राला दंडवत करण्यासाठीं वाट दाखवत होता.

बायबलच्या विचारसरणीत केवळ एकच व्यक्ती आहे जो ताऱ्याच्या संचालना मागे एका विशिष्ट हेतूने असू शकतो : स्वतः देव.

म्हणून, धडा स्पष्ट आहे : देव परराष्ट्रीयांस ख्रिस्ताची उपासना करण्यासाठीं मार्ग दाखवत आहे. आणि तो ते पूर्ण करण्यासाठीं वैश्विक - शक्यतः सार्वत्रिक सुद्धा - प्रभाव आणि सामर्थ्य कामी लावण्याद्वारे करीत आहे.

लूक दाखवितो कीं देव संपूर्ण रोमी साम्राज्यास प्रभावित करतो यासाठीं कीं जनगणना अगदी त्याच वेळी घडून यावीं ज्यावेळी तो एका अतिशय सामान्य कुमारीकेस तिच्या प्रसवाद्वारे भविष्यवाणी पूर्ण व्हावी म्हणून बेतलेहेमास घेऊन येतो. मत्तय दाखवतो कीं देव आकाशात तारा चालवितो यासाठीं कीं थोडक्या मुठभर परराष्ट्रीयांस देवाच्या पुत्राला नमन करता यावे म्हणून बेथलेहेमास जाता यावे.

ही देवाची योजना आहे. ही त्यानें तेव्हां केली. तो आजहि त्यावर काम करित आहे. त्याचे ध्येय आहे राष्ट्रांनी - सर्व राष्ट्रांनी (मत्तय 24:14) – त्याच्या पुत्राची उपासना करावी, त्यास नमन करावे.

तुम्हीं जेथें काम करतां त्यां तुमच्या कार्यालयात, आणि तुमच्या वर्गात, आणि तुमच्या शेजारी, आणि तुमच्या घरी प्रत्येकासाठीं देवाची हीच इच्छा आहे. योहान 4:23 मध्यें म्हटल्याप्रमाणें, “असे आपलें उपासक असावेंत अशीच पित्याची इच्छा आहे.”

मत्तयाच्या सुरूवातीला आपण आज देखील “या-पाहा” हा नमूना पाहतो. पण शेवटी नमूना आहे “जा-सांगा.” मागी लोक आले आणि त्यांनी पाहिले. आम्हांला जाऊन सांगावयाचे आहे.

पण वेगळे जर काही नसेल तर ते म्हणजें राष्ट्रांस एकत्र करण्यात देवाचा हेतू आणि सामर्थ्य कीं त्यांनी येऊन त्याच्या पुत्रास नमन करावे. सर्व राष्ट्रांच्या ज्वलंत उपासनेत ख्रिस्ताचे गौरव व्हावे यासाठींच हे जग अस्तित्वात आहे.

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

Solid JoysBy Alethia4India