Solid Joys

8 May : त्याच्या नीतिनियमांमध्यें आनंद


Listen Later

देवावर प्रीति करणे म्हणजें त्याच्या आज्ञा पाळणे होय; आणि त्याच्या आज्ञा कठीण नाहींत. कारण जे काही देवापासून जन्मलेले आहे ते जगावर जय मिळवते; आणि ज्याने जगावर जय मिळवला तो म्हणजें आपला विश्वास. येशू देवाचा पुत्र आहे असा विश्वास जो धरतो त्याच्यावाचून जगावर जय मिळवणारा कोण आहे? ( 1 योहन 5:3-5 ).

ह्या वचनात जें स्पष्ट केलें आहे ते म्हणजें हे कीं नवा जन्म झाल्यानंतर - देवापासून जन्मल्यानंतर - त्याच्या ज्या आज्ञा आपल्याला ओझ्याप्रमाणे वाटत होत्यां त्या आता आपला आनंद बनतांत. हा बदल कसा झाला?

नव्याने जन्मल्याने देवाच्या आज्ञा ओझं वाटण्याऐवजी आनंददायक कश्या वाटू लागतात?

प्रेषित योहन म्हणतो, "ज्याने जगावर जय मिळवला तो म्हणजें - आपला विश्वास" (1 योहन 5:4). दुसर्‍या शब्दात सांगयाचे झालें तर, जो देवापासून जन्मला आहे तो कश्या प्रकारे आज्ञापालनाच्या जगिक ओझ्यावर जय मिळवतो, तर ते विश्वासाला जन्म देऊन. याची पुष्टी 1 योहन 5:5 मध्यें केलीं आहे, तिथें आपण वाचतो, "येशू देवाचा पुत्र आहे असा विश्वास जो धरतो तो देवापासून जन्मला आहे."

आपला विश्वास आपण देवापासून जन्मलेले आहोत याचा पुरावा आहे. आपण देवावर विश्वास ठेवून स्वत: चा नवा जन्म घडवत नाहीं. देव आपला नवा जन्म घडवून आणतो आणि मग आपल्यामध्यें विश्वास ठेवण्याची इच्छा निर्माण करतो. जसा पेत्र त्याच्या पहिल्या पत्रात सांगतो, "जिवंत आशा प्राप्त होण्यासाठीं आपल्याला पुन्हा जन्म दिला" (1 पेत्र 1:3). आपली जिवंत आशा, किंवा आपला भावी कृपेवरील विश्वास, हे आपल्या नवीन जन्मादवारे देवानें घडवीलेले कार्य आहे.

जेव्हां योहान म्हणतो "जे काही देवापासून जन्मलेले आहे ते जगावर जय मिळवते," आणि मग तो पुढे सांगतो कीं, "ज्याने जगावर जय मिळवला तो म्हणजें - आपला विश्वास " (1 योहान 5:4). याचा अर्थ मी असा घेतो कीं देवानें नवीन जन्मा द्वारें आपल्याला जगावर जय मिळवण्यासाठीं समर्थ केलें - ते अश्या प्रकारे कीं, आपली आज्ञा पाळण्याच्या जगिक नाखुशीवर जय मिळवून. आपल्यामध्यें विश्वास निर्माण करून नवीन जन्म हे घडवून आणतो, ज्याचा पुरावा म्हणजें आपली प्रवृत्ती बदलून गेल्याने आपल्याला देवाच्या आज्ञा पाळणे ओझ्याप्रमाणे न वाटता, त्या आपल्याला संतोष देतात. यास्तव, तो विश्वास आहे जो आपल्यातील आणि देवामधील आणि त्याच्या इच्छांमधील जन्मजात शत्रुत्वावर जय मिळवतो, आणि त्याच्या आज्ञा पाळण्याकरिता आपल्याला मुक्त करतो, जेणे करून आपण स्तोत्रकर्त्या सोबत म्हणू शकू. "हे माझ्या देवा, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यात मला आनंद आहे" ( स्तोत्र 40:8 ).

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

Solid JoysBy Alethia4India