Solid Joys

9  May : देवावर प्रीति करणे म्हणजें काय


Listen Later

हे देवा, तू माझा देव आहेस; मी आस्थेने तुझा शोध करीन; शुष्क, रुक्ष व निर्जल प्रदेशात माझा जीव तुझ्यासाठीं तान्हेला झाला आहे, माझ्या देहालाही तुझी उत्कंठा लागली आहे. अशा प्रकारे तुझे बळ व वैभव पाहण्यास पवित्रस्थानी मी तुझ्याकडे दृष्टी लावली आहे. ( स्तोत्रसंहिता 63:1-2 )

दाविदासारख्या अंत:करणाचे समाधान केवळ देवच करू शकतो. आणि दाविद हा देवाच्या अंत:करणाचा माग घेणारा पुरुष होता. आपली निर्मिती यासाठींच झाली आहे.

देवावर प्रीति करणे म्हणजें काय याचे सार हेच आहे : देवामध्यें समाधानी असणे. देवामध्यें - तो देणार्‍या भेटीं मध्यें नाहीं, पण देवामध्यें, त्याच्या गौरवी व्यक्तित्वा मध्यें!

देवावर प्रीति करणे यात त्याच्या आज्ञा पाळणे हे आलेच; त्याच बरोबर त्याच्या वचनावर विश्वास ठेवणे; तसेंच त्याच्या सर्व दानांसाठीं त्याचे उपकार मानणे. पण हे सर्वे वरवरचे आहे. देवावर प्रीति करण्याचे मुलतत्व म्हणजें तो जसा आहे त्यासाठीं त्याचे कौतुक वाटणे आणि त्याचा आनंद घेणे. आणि देवा मधील हा आनंदच आपल्या इतर प्रतिसादांना त्याच्या करिता गौरवी करतो.

आपल्याला हे सर्व अंतर्ज्ञानाने आणि वचनाद्वारें ठाऊक आहे. आपले प्रियजन जे आपले सेवा करीत असतात, तेव्हां आपल्याला कधी सन्मान मिळाल्या सारखे वाटते , जेव्हां ते एक बंधन म्हणून करत  असतात का जेव्हां ते सहभागीतेतिल आनंदाकरिता करतात तेव्हां?

माझ्या पत्नीला खूप सन्मानित तेव्हां वाटते जेव्हां मी म्हणतो, "मला तुझ्या सोबत वेळ घालवल्याने खूप आनंद होतो." माझा आनंद हा तिच्या उत्कृष्टतेचा प्रतिध्वनि आहे. आणि देवासोबत पण असेंच आहे. आपण जेव्हां त्याच्यामध्यें सर्वाधिक समाधानी असतो, तेव्हां तो आपल्यामध्यें सर्वाधिक गौरवला जातो.

आपण कुणीच देवामध्यें परिपूर्ण समाधान प्राप्त करू शकलो नाहीं. जेव्हां मला कोणत्या भौतिक गोष्टीला किंवा समाधांनाला गमवावे लागते तेव्हां माझ्या कुरकुरण्यावर मी खूप दु:खी होतो. पण मी जाणले आहे कीं देव हा चांगला आहे. देवाच्या कृपेने आनंदाच्या सार्वकालिक झर्‍याला मी जाणतो. आणि त्यामुळें मला माझे दिवस लोकांना ह्या आनंदाचे आमिष देण्यात घालवायला आवडते, जो पर्येंत ते माझ्या बरोबर हे म्हणत नाहींत, परमेश्वराजवळ मी एक वरदान मागितले, त्याच्या प्राप्तीसाठीं मी झटेन; ते हे कीं, आयुष्यभर परमेश्वराच्या घरात माझी वस्ती व्हावी; म्हणजें मी परमेश्वराचे मनोहर रूप पाहत राहीन व त्याच्या मंदिरात ध्यान करीन" ( स्तोत्रसंहिता 27:4 ).

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

Solid JoysBy Alethia4India