एका कुटुंबाचा शहाणपणाचा निर्णय म्हणजे कौटुंबिक समझौता. इथे कोणीतरी जेष्ठ, बलवान किंवा त्या समाजातील मान्यवर असा व्यक्ती जेव्हा सगळ्यांना एकत्र घेऊन शहाणपणाच्या चार गोष्टी जेव्हा सांगू शकतो त्याच वेळेला कौटुंबिक समझौता सहज घडू शकतो. आपल्याकडे कुटुंबामध्ये कलह लावून अनावश्यकरीत्या न्यायालयाच्या पायऱ्या चढायला लावणारे पुष्कळ दिसून येतात. यात बऱ्याचदा त्यांचा कोणताही आर्थिक फायदाही नसतो फक्त माझ्यापेक्षा दुसरा कोणीतरी अधिक दुःखी आहे याच्यातच त्यांना आनंद वाटत असतो त्यामुळेच कौटुंबिक समझौता म्हणजे काय याची माहिती या व्हिडिओतून प्रत्येक कुटुंबाने नक्कीच घ्यायला पाहिजे