पाऊस पडला कि त्याला तिची आठवण येते. त्यांची पहिली भेटही भर पावसात झाली होती. आजही बाहेर मुसळधार पाऊस पडत होता आणि तो तिच्या आठवणीत रमला होता. आज तो पावसाला तिच्या बद्दल सांगत होता. त्यांच्या पहिल्या भेटीबद्दल पावसाशी बोलत होता. कारण तिच्यामुळेच तो पावसाच्या प्रेमात पडला होता आणि तिच्या सुद्धा.