ग्रंथप्रेमी - Granthpremi

अशी झाली पेशवाईची सुरुवात| Bajirao Peshva - I |Ep-48| Granthpremi Podcast #MarathaHistory #KakaVidhate


Listen Later

थोरले बाजीराव म्हणजे शौर्याचा सागर आणि प्रचंड विजयांचा धनी असलेला अजेय, अपराजित पेशवा ! मराठ्यांच्या मनात साम्राज्याचं स्वप्न पेरणारा ! साध्या बाजीगर शिलेदारांतून जयवंत सरदार घडवणारा ! हिंदुस्थानात मराठी फौजा तुफानासारख्या नाचवणारा ! दिल्लीवर धडक मारून बादशाही तख्त त्याने हादरवलं.

दख्खनेत दंडेली करणाऱ्या निजामाची नांगी ठेचली. कोकणात लष्कर घालून सिद्दी आणि फिरंग्यांची कंबरडी मोडली. इंग्रजांना धडकी भरवली. शत्रूच्या सामर्थ्य नि शक्तीच्या फळ्या फोडून सर्वत्र मराठ्यांचा दरारा निर्माण केला. केवळ 20 वर्षांच्या अल्प काळात हे मन्वंतर घडवलं.


या आणि येणार्‍या काही episodes मध्ये आपण चर्चा करतोय "देवयोद्धा" या श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या आयुष्यावरील महाकादंबरीचे लेखक आणि इतिहास अभ्यासक श्री काका विधाते यांच्याशी. विषय आहे थोरले बाजीराव पेशवे यांचा इतिहास, कार्य आणि कर्तृत्व. या पहिल्या भागात आपण खालील मुद्दे कवर केले आहेत :

औरंगजेबाचा मृत्यू , छत्रपती शाहू महाराज यांची सुटका, छत्रपती शाहू महाराज आणि ताराराणी यांचा संघर्ष , मराठी सरदारांची द्विधा मनस्थिती, बाळाजी विश्वनाथ यांना सेनाकर्ते ही जबाबदारी का दिली गेली? बाळाजी विश्वनाथ यांचा पेशवे म्हणून कार्यकाळ कसा होता ? थोरल्या बाजीरावांनी जेव्हा पेशवेपदाची सूत्रे हाती घेतली तो काळ कसा होता? त्याच्या समोर काय आव्हाने होती?


या विडियो मध्ये सांगण्याच्या भरात २ तारखा चुकल्या आहेत त्याची दुरूस्ती खालील प्रमाणे :

१ ) बाजीराव यांचा जन्म १८ ऑगस्ट १७०८ असा सांगितला आहे. तो १८ ऑगस्ट १७०० असा पाहिजे. (स्क्रीनवर दुरूस्ती केली आहे)

२) १७ नोव्हेंबर १७०७ अशी बाळाजी विश्वनाथ यांना पेशवे पद मिळाल्याची तारीख सांगितली आहे. ती १७ नोव्हेंबर १७१३ अशी पाहिजे. (स्क्रीनवर दुरूस्ती केली आहे)


Credits:

Guests: Kaka Vidhate (Author of many popular historical novels like Duryodhan, Santaji, Devyoddha in Marathi, Many of his books are translated in English)

Hosts: Nachiket Kshire (Writer, Podcaster)

Editor: Veerendra Tikhe

Studio: V-render Studio, Pune

Production: Sounds Great NM Audio Solutions LLP

Produced for: Neemtree Tech Labs Pvt Ltd


देवयोद्धा त्रिखंडात्मक कादंबरीच्या दुसर्‍या सुधारित आवृत्तीचे छपाई काम सध्या सुरू आहे. ही आवृत्ती prebook करण्यासाठी खालील लिंक वापरुन आपली मागणी नोंदवा :

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScToia5ck8VBVgM_vgh8OQpsiItU_d3qmcBOjoE19a6WVzbiA/viewform?usp=header


पुस्तका सदर्भात आधिक माहितीसाठी पुस्तकाची लिंक ->

https://granthpremi.com/products/devyoddha



Connect with us:

Instagram: https://instagram.com/granthpremi

Email: [email protected]

#Granthpremi #MarathiPodcasts #marathahistory #Devyodha #ThorleBajiraoPeshve

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

ग्रंथप्रेमी - GranthpremiBy Dwitiya Sonawane