पालखेडचे युद्ध जिंकल्यानंतर थोरल्या बाजीरावांची कीर्ती भारतभर पसरली व इथून दख्खन/माळव्यात मराठा साम्राज्याची मुहुर्तमेढ रोवली गेली! श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचा इतिहास, कार्य आणि कर्तृत्वाचा आढावा घेणार्या या पॉडकास्ट च्या मालिकेतील हा तिसरा भाग. या भागात आपण चर्चा करतोय "देवयोद्धा" (बाजीराव पेशवे यांच्या आयुष्यावरील कादंबरी) कादंबरीचे लेखक आणि इतिहास अभ्यासक श्री काका विधाते यांच्याशी आणि विषय आहे पालखेडचा रणसंग्राम! काय पहाल या तिसर्या भागात ? :-
पालखेड लढाईच्या वेळी परिस्थिती काय होती?
स्वराज्यावरचे हे आक्रमण पूर्वीच्या आक्रमणांपेक्षा वेगळे कसे होते?
निजामाने शाहू महाराजांच्या दरबारातले बरेचसे सरदार / मंत्री फितवले आणि आपल्या बाजूने वळवले, ते कसे ?
त्याने दरबारातले सरदार आणि बाजीराव यांच्यामध्ये दुरावा कसा वाढवला?
निजामाचे राजकारण आणि खेळया काय होत्या ?
पालखेडच्या लढाई मागची कारणे काय होती?
निजाम विरुद्ध बाजीराव हा सामना कसा विषम होता.. बाजीरावांपुढे काय अडचणी होत्या?
बाजीरावांनी या युद्धात काय रणनीती वापरली?
युद्धाचा आराखडा काय होता? कुठले डावपेच आणि व्यूह रचले गेले?
पालखेडची लढाई ही जगातल्या उत्कृष्ट लढयांपैकी एक का मानली जाते.. ?
युद्धशास्त्रीय दृष्टिकोणातून पालखेडच्या लढाईचे महत्व काय.. ?
या युद्धाबद्दल आणि बाजीरावांबद्दल भारतीय आणि परकीय इतिहासकार काय म्हणतात?
बाजीरावांची तुलना जगातल्या थोर सेनापतींशी का केली जाते?