ग्रंथप्रेमी - Granthpremi

ग्रंथप्रेमी - Granthpremi

By Dwitiya SonawaneArtsBooksLeisureHobbies
Download on the App Store

ग्रंथप्रेमी - Granthpremi episodes

  • What Triggered An Intese Kundalini Shift ? | Tejal Patrikar | Granthpremi podcast

    Uncover a powerful spiritual encounter that didn't make it to the main episode. The speaker reveals a startling dream experience where a moment of complete surrender triggered an intense, earthquake-like Kundalini shift within. This rare clip explores the hidden side of Indian classical art—from high-speed dance turning into deep meditation, to legendary flute maestro Keshav Ginde losing track of time during a 3.5-hour initiation by Gulawani Maharaj. What happens when music moves past external sound to unlock the unspoken inner sound (Anahata Nad)? Watch to find out. Key Topics Covered:

    A Divine Awakening: An experience triggering an intense Kundalini shift.
    Meditation in Motion: Entering deep states of bliss through music and dance.
    The Unspoken Sound: Moving beyond technical music to experience Anahata Nad.
    A Timeless Initiation: The story of Keshav Ginde and Gulawani Maharaj.
    मुख्य एपिसोडमध्ये न आलेली एक अलौकिक अध्यात्मिक अनुभूती या व्हिडिओमध्ये पाहा! एका स्वप्नात संपूर्ण शरणागत भाव पत्करल्यावर आतून तीव्र कुंडलिनी जागरण कसे घडले, याचा एक थक्क करणारा अनुभव इथे शेअर केला आहे. भारतीय कलेची एक अप्रकाशित बाजू उलगडणारी ही दुर्मिळ क्लिप आहे— वेगवान नृत्य थेट ध्यानावस्थेत रूपांतरित होते आणि बासरीवादक केशव गिंडे पूज्य गुळवणी महाराजांकडून दीक्षा घेताना ३.५ तास पूर्णपणे काळाचे भान हरपून बसतात. संगीत जेव्हा बाह्य सुरांच्या पलीकडे जाऊन अंतरात्म्यातील ‘अनाहत नाद’ उघड करते, तेव्हा काय घडते? जाणून घेण्यासाठी नक्की पाहा!

    8 min
  • The Real Reason Behind India's Gen Z Protests Isn't the NEET Paper Leak.. | Shridhar Loni podcast

    दर दहा वर्षांनी इंजिनिअरिंग कॉलेजची फी दुप्पट होते. दरवर्षी लाखो पदवीधर बाहेर पडतात, पण नोकरी मिळते जेमतेम निम्म्यांना. इंजिनिअर झालेल्यांपैकी दहा टक्क्यांहूनही कमी मुलं नोकरीसाठी सक्षम मानली जातात. मग जेन झी रस्त्यावर उतरली, याचं आश्चर्य वाटायला नको.

    ज्येष्ठ पत्रकार, लेखक आणि महाराष्ट्र टाइम्सचे निवासी संपादक श्रीधर लोणी यांच्याशी झालेली ही सविस्तर बातचीत. निमित्त — त्यांचं नवं पुस्तक 'सत्योत्तर जगाची खबरबात'. सुरुवात झाली NEET पेपरफुटीपासून, आणि गप्पा येऊन थांबल्या अशा एका मुद्द्यावर ज्यावर फारसं कुणी बोलत नाही — "सार्वजनिक प्रश्नांवर आपण खाजगी उत्तरं का शोधतो..?" सरकारी शाळेचा दर्जा घसरला? मुलाला खाजगी शाळेत घाला. बस वेळेवर येत नाही? स्वतःची गाडी घ्या. महापालिकेचं पाणी येत नाही? टँकर मागवा. कमावलेल्या शंभर रुपयांतले चाळीस रुपये नेमक्या याच तीन गोष्टींवर खर्च होतात — ज्या मुळात सरकारने करायच्या होत्या.
    अजून काय पाहाल या भागात?
    गुणवत्तेचं मिथक, सत्योत्तर जग (post-truth) म्हणजे नेमकं काय · वाजपेयींनी २००० साली संशोधनासाठी दिलेलं वचन काय होते, जे सव्वीस वर्षांनंतरही अपूर्ण आहे · आणि AI मुळे आपली प्रतिभा खरंच धोक्यात आहे का?
    श्रीधर लोणी यांनी लिहीलेल्या "सत्योत्तर जगाची खबरबात" हे पुस्तक ग्रंथप्रेमी वेबसाइट वरुन घरपोच मागवण्यासाठी खालील लिंक वापरा :
    https://granthpremi.com/products/satyottar-jagachi-khabarbat

    1 hr 8 min
  • Arunima Sinha: First Woman Amputee to Climb Mt Everest | Born Again on the Mountain Book Story

    धावत्या ट्रेनमधून गुंडांनी फेकून दिल्यानंतर, रात्रभर रक्ताच्या थारोळ्यात रेल्वे रुळावर पडून राहिलेल्या अरुणिमा सिन्हा यांची ही थरारक आणि प्रेरणादायी कहाणी!

    राष्ट्रीय व्हॉलीबॉलपटू अरुणिमा सिन्हा यांनी अपघातात पाय गमावल्यानंतर जेव्हा सगळ्यांनी 'आता संपलं' म्हटलं, तेव्हा त्यांनी पाहिलं सगळ्यात अशक्य स्वप्न - Mt Everest.
    लोक हसले, डॉक्टरांनी नकार दिला, पण एका जिद्दीने सगळं कसं शक्य झालं?
    'ग्रंथप्रेमी'च्या आजच्या भागात अरुणिमा सिन्हा यांच्या 'बोर्न अगेन ऑन द माउंटेन' (अनुवाद: फिरुनी पुन्हा जन्मले मी - बापू करंदीकर) या आत्मचरित्राचे हृदयस्पर्शी अभिवाचन करण्यात आले आहे.
    ही फक्त शिखर सर करण्याची गोष्ट नाही, तर अंधारातून प्रकाशाकडे जाण्याची गोष्ट आहे - शेवटपर्यंत नक्की ऐका.

    26 min
  • Can Music Really Heal You? | Science behind Music & Spirituality | Tejal Patrikar | Granthpremi

    In this episode, Tejal Patrikar explores the deep connection between Indian classical music, sound healing, and spirituality. Discover how specific ragas, chants, and scientific research reveal the power of sound vibrations on human consciousness and energy. In this insightful conversation, Nachiket Shirke hosts Tejal Patrikar from Maharshi Adhyatma Vishwavidyalaya to discuss the transformational role of art in spiritual growth. They dive into real-life experiments using advanced instruments like the Universal Aura Scanner and GDV technology to measure the positive vibes of classical music versus modern genres.

    Key Topics Covered in This Episode:
    * The Vedic origins of Indian classical music & Samaveda
    * Why art goes beyond entertainment and serves as a path to self-realization
    * Real scientific experiments tracking aura changes, chakra balance, and energy levels
    * How chanting specific mantras (like Raag Malkans & Shree Ram) impacts peace of mind * Practical steps for artists and listeners to experience true sound healing

    1 hr 16 min
  • Fake Profiles, Trolling, Online Scams: A Parent's Guide to Cyber Safety

    Cyberbullying Prevention, Online Safety & Digital Parenting | Cyber Palaktva by Mukta Chaitanya | Marathi Book Reading

    Is your child really safe on social media? The disturbing truth about cyberbullying, trolling, fake profiles and hidden online dangers — a must-watch for every parent and teacher.
    Is your child showing signs of feeling low, or being trolled on social media? How do you spot sudden changes in their behaviour? How do you warn them about unknown online "friends"? And how do you build an open, friendly line of communication with your child in the digital age?
    In this special episode, we present a reading of 'Cyber Palaktva' (सायबर पालकत्व) by Mukta Chaitanya — an important book that uncovers the invisible and often frightening realities of the digital world — along with detailed guidance for parents on these issues. Watch till the end for the complete picture.
    Key points covered in this episode:
    The harsh reality of trolling
    4 major red flags in online friendships
    Fake profiles and unsafe adult contact or behaviour
    Online scams and tactics parents should know
    The responsibility of parents and teachers

    20 min
  • How to chase your dreams ? Overcoming fear of failure | जो जे वांछील book summary | ग्रंथप्रेमी

    जो जे वांछील | Jo Je Vanchil — Nachiket Kshire | Marathi Book Reading

    Marathi book reading / abhivachan of जो जे वांछील (Jo Je Vanchil) by नचिकेत क्षिरे (Nachiket Kshire), Neemtree Publishing House — a Marathi motivational book, audio book style, on Granthpremi.
    In this Marathi book summary we read the chapter where Aniket Joshi, an ordinary middle-class Marathi man, meets his mentor Chougule and asks the question most of us carry: is it foolish to dream?
    Chougule's answer cuts through the "सांभाळून, तुला नाही जमणार" conditioning we absorb at home, at school and at work — and explains why chasing external validation keeps your dreams small.
    He separates dreams built on ego from dreams built on purpose, using Dadasaheb Phalke, Vikram Sarabhai and the Wright Brothers to show why the attempt matters more than the outcome.
    Watch till the end to find out what happens at Anvay's munj

    25 min
  • जो पर्यंत आकाशात चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत वारी असणार आहे.. | रूपाली शिंदे वारी पॉडकास्ट - 2

    In this video, we delve into the world of Pandharpur Wari, a centuries-old tradition that has been an integral part of Marathi culture, particularly during ashadhi ekadashi. The wari, which is a pilgrimage to the revered temple of Vitthal in Pandharpur, has been a symbol of devotion and spirituality for millions of followers of sant tukaram and dnyaneshwar mauli. However, beneath the surface of this grand spectacle, lies a complex web of commercial interests and exploitation. We explore the dark side of devotion, where the lines between faith and business are blurred, and the true essence of spirituality is often lost in the chaos of ashadhi wari.

    वारकरी संप्रदायाची वारी म्हणजे केवळ एक धार्मिक सोहळा आहे का? कि त्यामागे एक अथांग सामाजिक आणि आर्थिक विचार दडलाय? सुमारे १३ लाख वारकरी जेव्हा विठ्ठलाच्या ओढीने पंढरपूरच्या वाटेवर चालतात, तेव्हा महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला कोटींची चालना कशी मिळते? एका साध्या विक्रेत्यापासून ते गावच्या आठवडे बाजारापर्यंत, वारी कशी प्रत्येकाचा पोशिंदा बनते, याचे सुरेख गणित या भागात मांडले आहे.
    परंतु, आजच्या जागतिकीकरणाच्या युगात वारीसमोर 'भक्तीचा व्यापार' आणि 'मूल्यभ्रष्ट अर्थकारणाचे' मोठे आव्हान आहे. राजकीय नेत्यांचा हस्तक्षेप आणि कॉर्पोरेट बाजारपेठेच्या या काळात वारीचे मूळ सत्व कसे टिकवून ठेवायचे? संतांनी दिलेला निर्भेळ विचार आणि सामान्य वारकऱ्याचा सदसद् विवेक बुद्धी या संकटांवर कशी मात करेल, याचे अभ्यासपूर्ण विश्लेषण आपल्याला पाहायला मिळेल.
    या वारी विशेष च्या दुसर्‍या भागात संत साहित्याच्या अभ्यासक डॉ. रूपाली शिंदे यांनी 'निर्मल वारी अभियान' आणि पर्यावरण संवर्धनासारख्या आधुनिक उपक्रमांतून वारी कशी लोकजागृतीचे प्रभावी माध्यम बनली आहे, हे सांगीतले आहे

    39 min
  • मुघलांना आव्हान देणारी ही राणी आणि तिचा इतिहास माहीत आहे का..? | India's undefeated Queens & History

    स्वराज्याचे छत्रपती जेव्हा मुघलांच्या वेढ्यातून निसटून दक्षिणेकडे जात होते, तेव्हा औरंगजेबाचा संताप ओढवून घेण्याची ताकद भारतातल्या कोणत्या राजाकडे होती? अशा अत्यंत कठीण काळात, मुघलांना आव्हान देणारी एकमेव शूर राणी म्हणजेच केळदीची राणी चेन्नम्मा! मेजर मोहिनी गर्गे कुलकर्णी लिखित "अपराजिता — गाथा भारतीय वीरांगणांची" या ग्रंथातून Granthpremi अभिवाचनाच्या या दुसर्‍या भागात आपण या महान वीरांगनेचा इतिहास continue करतोय.

    या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत?
    • छत्रपती शहाजीराजे आणि केळदीच्या घराण्याचे ऋणानुबंध.
    • गनिमी कावा: मुघल सैन्याचा जंगलात केलेला पराभव.
    • मराठा स्वराज्याचा दिवा तेवता ठेवण्यासाठी राणीने काय मदत केली?
    • बार्टर ट्रेड आणि आंतरराष्ट्रीय मुत्सद्दीपणा: पोर्तुगीज आणि अरबांशी केलेले व्यवहार.
    • शिवतत्व रत्नाकर ग्रंथ : भारतीय संस्कृतीचा ज्ञानकोश.
    • राणी चेन्नम्माचा अंतिम उपदेश: संकटकाळात निर्भय राहण्याची आणि नम्र राहण्याची गुरुकिल्ली.

    25 min
  • आषाढी वारी २०२६ | पंढरपूर वारीचं व्यवस्थापन चालतं कसं? MBA मध्ये शिकवावं असं नियोजन | डॉ रूपाली शिंदे

    आषाढी वारीच्या मुहूर्तावर लाखो पावलं पुन्हा पंढरीच्या वाटेला लागली आहेत. असंख्य वारकरी, ७०० वर्षांची अखंड परंपरा — आणि आजवर एकही चेंगराचेंगरीची घटना नाही. कोणतीही केंद्रीय यंत्रणा नसताना हे घडतं तरी कसं?
    पंढरपूरची वारी म्हणजे केवळ एक यात्रा नव्हे — ती महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख आहे. "जिथं वारकरी, तिथपर्यंत महाराष्ट्र" असं रंगनाथ पठारे का म्हणतात? पालखीची परंपरा तुकोबांनी नव्हे, तर त्यांच्या पुत्रांनी सुरू केली हे किती जणांना ठाऊक आहे? ज्ञानोबा-तुकोबांच्याही आधीपासून वारी चालत आली आहे, नामदेवांचे तब्बल ४० अभंग शिखांच्या गुरु ग्रंथ साहिबात विराजमान आहेत — आणि जगाला व्यवस्थापनाचे धडे देणारे मुंबईचे डबेवाले मुळात वारकरीच आहेत!
    या वारी विशेष भागात संत साहित्याच्या अभ्यासक डॉ. रूपाली शिंदे वारीचं अंतरंग उलगडले आहे — ज्ञानेश्वर माऊलींनी घातलेला तत्त्वज्ञानाचा पाया, नामदेवांनी उभी केलेली कीर्तन-अभंगांची प्रसारयंत्रणा, विठ्ठल म्हणजे नेमका कोण या वादाचं अभ्यासपूर्ण उत्तर, आणि हैबतबाबा आरफळकरांनी वारीला लावलेली अशी शिस्त, जी आजही जशीच्या तशी चालते आहे.

    48 min
  • म्हणून Kangchenjunga सर्वात deadly शिखर आहे.. | Mountaineer Anand Mali Podcast | Granthpremi मराठी

    या पॉडकास्ट मध्ये आपल्यासोबत आहेत 'एव्हरेस्ट वीर' आणि गिर्यारोहक आनंद माळी. जगातलं तिसरं सर्वोच्च आणि तांत्रिकदृष्ट्या सर्वात अवघड असे 'कांचनजुंगा' शिखर सर करताना त्यांच्यावर नेमके कोणते प्रसंग ओढवले, 'रेनिंग रॉक्स' (वरुन कोसळणारे दगड) आणि मृत्यूचं दुसरं नाव असलेल्या 'हँगिंग ग्लेशियर' मधून वाट काढताना आलेल्या अडचणी, जेव्हा एका मिनिटाच्या चुकीमुळे जीव जाऊ शकतो, अशा वेळी गिर्यारोहक नेमका काय निर्णय घेतात? हे सगळे थरारक अनुभव त्यांनी शेअर केले आहेत. आनंद यांच्या 'Kangchenjunga : Summit of My Dreams' या नवीन पुस्तकाच्या निमित्ताने झालेली ही चर्चा तुम्हाला खिळवून ठेवणारी आहे.
    महत्वाचे मुद्दे
    १. कांचनजुंगा: जगातलं सर्वात धोकादायक शिखर: एव्हरेस्टपेक्षाही कांचनजुंगा सर करणं अधिक कठीण का मानलं जातं? तिथलं हाड गोठवणारं तापमान, तीव्र चढण आणि दोन महिने चालणारा जीवघेणा संघर्ष याबद्दलची सविस्तर माहिती.
    २. 'रेनिंग रॉक्स' आणि 'हँगिंग ग्लेशियर' : पर्वतावरून अचानक सुटणारे दगड (Raining Rocks) आणि कधीही कोसळू शकणारे Hanging Glaciers यांमधून मार्ग काढताना एका सेकंदाची चूक कशी जीव घेऊ शकते, याचा थरारक अनुभव.
    ३. 'फ्रॉस्टबाईट' (Frostbite) म्हणजे काय? : अतिथंडीमुळे शरीराचे अवयव कसे निकामी होतात (Frostbite), ते टाळण्यासाठी गिर्यारोहक कोणती काळजी घेतात आणि नवशिक्या गिर्यारोहकांच्या कोणत्या चुकांमुळे त्यांना स्वतःचे हात-पाय गमवावे लागतात, याबद्दल माहिती.
    ४. रोटेशन्स (Rotations) चे विज्ञान आणि ऑक्सिजनची कमतरता : विरळ हवेत जिवंत राहण्यासाठी 'रोटेशन' पद्धत कशी वापरली जाते? शरीराला कमी ऑक्सिजनची सवय कशी केली जाते आणि ऑक्सिजन ५५% वर आल्यावर मानवी शरीरावर काय परिणाम होतो?
    ५. मागे वाट पाहणारं कुटुंब शिखरावर जिवंत राहण्यासाठी कशी ताकद देतं, हा भावनिक प्रवास.
    Everest mountaineer Anand Mali joins Granthapremi Podcast to reveal the terrifying true story of summiting Kanchenjunga — the world's 3rd highest and most technically challenging peak — battling frostbite, raining rocks, and deadly hanging glaciers.
    A gripping conversation on his new book "Kanchenjunga: Summit of My Dreams," covering high-altitude survival, oxygen depletion, rotation climbing techniques, and the emotional letters from home that kept him alive at 7,000m.

    49 min

About ग्रंथप्रेमी - Granthpremi

From the publisher's feed

ग्रंथप्रेमी - मराठी साहित्यावरील पॉडकास्ट! www.granthpremi.com हा पॉडकास्ट सर्व मेजर पॉडकास्टिंग प्लॅटफॉर्म्स वर उपलब्ध आहे. फॉलो करा - https://linktr.ee/granthpremi