ग्रंथप्रेमी - Granthpremi

ग्रंथप्रेमी - Granthpremi

By Dwitiya SonawaneArtsBooksLeisureHobbies
Download on the App Store

ग्रंथप्रेमी - Granthpremi episodes

  • थोरले बाजीराव पेशवे खरा इतिहास 8 | The Tragic Death of Bajirao Peshwa | Kaka Vidhate | Maratha History

    बाजीराव-मस्तानीच्या नात्याकडे आपण आजवर केवळ एकाच नजरेतून पाहिले. पण या प्रकरणामागे एक मोठे राजकीय षडयंत्र दडलेले होते. त्या षडयंत्राचा सुत्रधार कोण ? चिमाजी अप्पा, राधाबाई आणि नानासाहेब यांची भूमिका काय होती? काही इतिहासकारांनी आणि लेखकांनी बाजीरावांवर मस्तानीमुळे कर्तव्य विसरल्याचा आरोप केला, मस्तानीचे आणि सोबत बाजीरावांचे चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न केला, पण खरा इतिहास काय सांगतो? ऐतिहासिक कागदपत्रे काय सांगतात?

    काय पहाल या एपिसोडमध्ये :
    मस्तानी खरोखरच बाजीरावांच्या वाईट सवयींना कारणीभूत होती की हा केवळ एक बनाव होता?
    बाजीरावांचे काशीबाईंवरील प्रेम कमी झाले होते का? पुरावे काय सांगतात?
    समशेर बहादूरची मुंज करावी अशी बाजीरावांची इच्छा होती ?
    मस्तानीला विरोधाची परिवारिक कारणे काय ? पेशवे / भट कुटुंब कशाला घाबरत होते?
    त्यावेळचा ब्राह्मण समाज बाजीरावांच्या विरोधात होता का ?
    काका विधाते यांनी मांडलेला हा इतिहास या एपिसोड मध्ये जरूर बघा कारण चित्रपटातील काल्पनिक पटकथा म्हणजे खरा इतिहास नव्हे ! थोरले बाजीराव पेशवे या सेरीज मधला हा शेवटचा एपिसोड आणि मराठेशाहीच्या इतिहासातील महत्वाचा भाग प्रत्येक मराठी माणसाला माहीत हवा.

    1 hr 1 min
  • थोरले बाजीराव पेशवे खरा इतिहास 7 | The Mastani Conspiracy | Kaka Vidhate | Maratha History #Bajirao

    बाजीराव-मस्तानीची कहाणी आपण सर्वांनी ऐकली आहे, पण आपल्याला जे सांगितलं गेलंय, ते सत्य आहे का? मस्तानी कलावंतीण (नाटकशाळा) होती की कुलवती ? मराठी बखरींनीच मस्तानी कुंवरचे अवमूल्यन केले का..? पेशव्यांच्या कारकुनांनी त्यांच्या आणि बाजीरावांबद्दल हीन भाषा का वापरली..? शनिवारवाड्यातला मस्तानी महाल का नष्ट करण्यात आला ? 'एक अस्सल चिठोर सर्व बखरींच्या बहुमताला हाणायला पुरेसे आहे' असं इतिहासाचार्य राजवाडे का म्हणाले होते? नाना फडणवीस अली बहादुरला धनी म्हणून का संबोधत होते ? इतिहासात मस्तानीची उपेक्षा का झाली ? अंतर्गत गृहकलह आणि राजकारण काय होते ? काय होती बाजीराव मस्तानीची खरी कहाणी ?

    42 min
  • थोरले बाजीराव पेशवे - खरा इतिहास 6 : Bajirao's Bhopal Victory & Vasai Conquest | ग्रंथप्रेमी मराठी पॉडकास्ट | काका विधाते

    परकीय आक्रमणे आणि मराठ्यांचा भीमटोला:

    जेव्हा इराणचा क्रूरकर्मा नादिरशहा भारतावर चालून आला, तेव्हा दिल्ली रक्ताने माखली होती. अवघ्या तीन तासांत ३० हजार निष्पाप लोकांची कत्तल आणि मयूर सिंहासनासह कोट्यवधींची लूट घेऊन जाणारा हा 'मौत का सौदागर' नेमका कोण होता? नादिरशहाच्या या आक्रमणामागे निजामाची आणि सादत खानाची फितुरी कशी होती, याचा पर्दाफाश या भागात करण्यात आला आहे.
    अशा कठीण काळात, जेव्हा मुघल साम्राज्य कोसळत होते, तेव्हा संपूर्ण हिंदुस्तानाची आशा केवळ बाजीराव पेशव्यांवर होती. सैन्य वसईत गुंतलेले असतानाही, बाजीरावांनी केवळ आपल्या नावाने नादिरशहाला रोखण्याचे 'धैर्य' कसे दाखवले? "परराज्य राहिले तरी सर्वांवरी आहे," ही बाजीरावांची राष्ट्रवादी भूमिका आणि त्यांनी नर्मदा-चंबळच्या पलिकडे शत्रूला रोखण्यासाठी आखलेली रणनीती श्री. काका विधाते यांनी अत्यंत ओघवत्या भाषेत मांडली आहे. भारताच्या इतिहासातील हा थरारक कालखंड समजून घेण्यासाठी हा पॉडकास्ट शेवटपर्यंत नक्की ऐका.


    1 hr 20 min
  • The Untold Reality of Marathi Book Industry | Samir Gudhate & Vinamra Podcast | Granthpremi मराठी
    मराठीत काही पुस्तकं 'बेस्ट-सेलर' ठरतात, तर काही काळाच्या पडद्याआड का जातात? मराठी साहित्य विश्वात नवीन लेखक तर येत आहेत, पण प्रकाशक आणि वितरणाचं काय? सोशल मीडियाच्या युगात एखादं पुस्तक 'बेस्ट सेलर' कसं ठरतं? 'ग्रंथप्रेमी पॉडकास्ट'च्या या भागात Book Influencers समीर गुधाटे आणि विनम्र भाबल यांनी मराठी पुस्तक उद्योगातील वास्तव मांडले आहे. केवळ पुस्तक लिहून चालत नाही, तर 'लेखक' म्हणून स्वतःला कसं प्रोजेक्ट करावे (Brand Building), यावर देखील त्यांनी प्रकाश टाकला आहे. या चर्चेतील महत्त्वाचे मुद्दे:
    * पुस्तकाचे मार्केटिंग: सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून पुस्तकं कशी विकावीत?
    * संपादकाचे महत्त्व: लेखकाने संपादकाचा सल्ला का मानला पाहिजे?
    * रिव्ह्यू आणि ब्लॉग्सचा विक्रीवर कसा परिणाम होतो?
    * नवीन उपक्रम: 'बॉन्डिंग विथ बुक्स' सारख्या कल्पनांमुळे वाचक कसे जोडले जातात?
    मराठी साहित्याला ग्लोबल बनवण्यासाठी लेखक आणि प्रकाशकांनी कोणती नवी धोरणे स्वीकारली पाहिजेत, हे जाणून घेण्यासाठी हा पॉडकास्ट शेवटपर्यंत नक्की पहा!
    1 hr
  • The Truth About "Toxic Masculinity" | Geetali Vi. Ma. Podcast Pt - II | ग्रंथप्रेमी मराठी

    सामाजिक कार्यकर्त्या गीताली वि.म. यांच्यासोबतच्या संवादाचा हा दुसरा भाग. या भागात 'मिळून साऱ्या जणी'चा ४० वर्षांचा थक्क करणारा प्रवास आणि जागतिक नेटवर्कचा उलगडा केला आहे. त्यांनी विवाहसंस्था, घटस्फोट आणि समतेवर आधारित नात्यांविषयी अत्यंत धाडसी आणि पारदर्शक विचार मांडून समाजाच्या ढोंगीपणाला आरसा दाखवला आहे. केवळ स्त्रियांच्या प्रबोधनावर न थांबता, पुरुषांमधील 'विषारी मर्दानगी' बदलून त्यांना संवेदनशील बनवणे ही काळाची गरज असल्याचे त्या सांगतात. घरकाम ही केवळ स्त्रीची जबाबदारी नसून ती सर्वांची कशी आहे, यावर त्यांनी परखड भाष्य केले आहे. चळवळीचा पुढचा टप्पा म्हणून 'सामूहिक नेतृत्व' आणि 'मैत्रभावाची' संकल्पना त्यांनी मांडली आहे. स्वतःच्या बंडखोर स्वभावापासून ते फर्गुसन कॉलेजमधील अध्यापनापर्यंतचा त्यांचा वैयक्तिक प्रवास खरोखरच प्रेरणादायी आहे. मानवी नात्यांकडे बघण्याचा एक नवा आणि सम्यक दृष्टिकोन देणारा हा विशेष भाग नक्की पहा!.

    "Toxic masculinity doesn't just hurt women; it destroys men too". Geetali Vi. Ma. discusses why men need to embrace sensitivity and how "hero culture" is a trap. She breaks down her bold stand on marriage, divorce, her own journey, and why Indian men must enter the kitchen. Learn how we can raise a generation of empathetic humans in this conversation.

    1 hr 11 min
  • मुलींच्या मृत्यूला सासरच नाही, तर माहेरपण जबाबदार! | The Dark Reality of Patriarchy| डॉ. गीताली वि म | Granthpremi मराठी

    शिक्षण मिळालं, आर्थिक स्थैर्य आलं, तरीही सुखाच्या नावाखाली मुलींची घुसमट का? आजच्या काळात उच्चशिक्षित आणि स्वावलंबी मुली टोकाचं पाऊल का उचलत आहेत, या प्रश्नाचं अस्वस्थ करणारं उत्तर या भागात दडलंय. मिळून सार्‍याजणी या मासिकाच्या संपादक आणि कार्यकर्त्या डॉ. गीताली वि. म. यांच्याशी मारलेल्या या गप्पा निव्वळ संवाद नाहीत, तर ते आरसा दाखवणारं वास्तव आहे. लग्नानंतर मुलीचं होणारं 'आदिम विस्थापन' (Primordial Displacement) म्हणजे नेमकं काय? ज्या घरात आपलं नाव, ओळख आणि अस्तित्वच पुसलं जातं, तिथे 'सहजीवन' कसं फुलणार? लग्नासाठी वडिलांनी केलेल्या खर्चाचं ओझं, मुलीला 'सहन' करायला कसं भाग पाडतं, यावर गीताली ताईंनी अतिशय मार्मिक भाष्य केलं आहे.
    या भागात तुम्ही काय पाहाल ?
    * चळवळ म्हणजे स्त्री विरुद्ध पुरुष नव्हे ?
    * स्त्री मृत्यूला सासरइतकंच 'माहेर' का जबाबदार असतं?
    * 'मिळून साऱ्या जणी' हे मासिक नव्हे तर चळवळ.
    * स्त्री चळवळीतून मिळालेलं आत्मभान आणि भविष्यातील आव्हाने.
    * पुरुषांना सक्षमीकरणाची गरज काय?
    हा व्हिडिओ प्रत्येक आई-वडिलांनी, मुलांनी आणि तरुण जोडप्याने आवर्जून पाहायला हवा. समाज बदलण्याची सुरुवात आपल्या स्वतःच्या घरापासून कशी करायची, हे समजून घेण्यासाठी हा एपिसोड नक्की पहा.
    Most people think Feminism is about "Women vs. Men." They’re wrong. In this episode, Dr. Geetali Vi. Ma. explains why true equality requires a complete update of our societal mindset.
    As a core leader of the iconic magazine "Milun Sarya Jani," Geetali Tai shares the journey of building a "Sakav" (Bridge) between rural struggles and urban aspirations. This isn't just about women's rights; it's about the "Maitrabhav" (Spirit of Friendship)—a gender-neutral approach to living that liberates both men and women from patriarchal traps.
    Inside the Episode:
    * The Inner Struggle: Why the fight for equality starts inside your own home (and your own head).
    * Beyond Slogans: How to move from "Brotherhood" to a more inclusive "Human-hood."
    * The Legacy of Vidya Bal: How a single magazine changed the lives of thousands of Marathi women.
    Whether you're a student, a professional, or a homemaker, this episode provides a blueprint for building healthier, more equitable communities.
    निरामय पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टमार्फत चालवलं जात असलेलं 'मिळून साऱ्याजणी' हे मासिक वर्गणी भरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंक वापरा :
    https://www.miloonsaryajani.in/subscribe
    अथवा
    सोमवार ते शुक्रवार, दुपारी १२ ते ५ या कार्यालयीन वेळेत ०२० - २५६५ ३९३८ किंवा ७४४७४४९६६४ या क्रमांकावर फोन करूनही कळवता येईल.

    1 hr 7 min
  • म्हणून मी निळावंती लिहिली...| सुमेध | महामाया निळावंती | अजातशत्रू | ग्रंथप्रेमी Podcast | Sumedh

    "लेखकाने आता influencer झाले पाहिजे.." - फिल्म इंडस्ट्री मध्ये पटकथाकार म्हणून काम करणारा सुमेध असे का म्हणाला? एखाद्या वेबसेरीजलाही मागे टाकतील अश्या महामाया निळावंती आणि अजातशत्रू या कादंबर्‍या लिहिणारा हा तरुण लेखक नेमका आहे कसा? त्याची creative process काय आहे? "निळावंती" कादंबरीची सुरुवात कशी झाली? निळावंतीला मिळालेले वाचकांचे प्रेम आणि गमतीदार किस्से.. पूर्ण वेळ लिखाण करून पैसा मिळू शकतो? हे आणि असे बरेच विषय आपल्याला ग्रंथप्रेमी पॉडकास्टच्या या एपिसोड मध्ये सुमेध कडून ऐकायला मिळतील.

    "Writers must become influencers" - This statement hits different when it comes from someone who actually researched ancient Tibetan texts for 3 years. Sumedh's novels feel like Netflix series in book form, and in this episode he reveals his complete creative process, the blue hair mystery that sparked "Nilavanti," and why most aspiring writers are approaching the game COMPLETELY wrong!
    सुमेधने लिहीलेल्या "महामाया निळावंती" आणि "अजातशत्रु" या दोन्ही कादंबर्‍या ग्रंथप्रेमी वेबसाइट वरुन घरपोच मागवण्यासाठी खालील लिंक वापरा : https://granthpremi.com/collections/books-by-sumedh

    1 hr
  • म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी हरिपाठ लिहिला.. | Anil Fadanvis | गोष्टीरूप हरिपाठ | Granthpremi मराठी

    माऊलींचा हरिपाठ माहीत नाही असा मराठी माणूस महाराष्ट्रात विरळाच! संत ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ जरी कानाला गोड वाटला आणि समजायला वरवर सोपा वाटला तरी त्याचा अर्थ आणि तत्वज्ञान खोल आहे. माऊलींच्या हरिपाठातील "सात पाच तीन दशकांचा मेळा" आणि "नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ" हे अभंग आणि त्याचा गूढ अर्थ समजून घेवूया ग्रंथप्रेमी मराठी पॉडकास्ट च्या या विशेष एपिसोड मध्ये गोष्टीरूप हरिपाठ पुस्तकाचे लेखक, योग शिक्षक आणि कीर्तनकार श्री अनिल फडणवीस यांच्याकडून. नामजपाचे आणि हरिपाठाचे महत्व नेमके काय आणि तो संसारी माणसांना कसा उपयोगी आहे ही चर्चा आपण या भागात केले आहे. नचिकेत क्षिरे यांनी हा संवाद साधला आहे. रामनामाची गोडी वाढवायची असेल आणि हरिपाठ समजून घ्यायचा असेल तर हा एपिसोड चुकवू नका! राम कृष्ण हरी!

    53 min
  • म्हणून मुक्ताबाईंना आदिमाया म्हणतात.. | Dr Rupali Shinde Podcast Part - 2 | Granthpremi

    सगळं असूनही काहीतरी हरवल्यासारखं का वाटतं? नैराश्य का येतं? याचं उत्तर ७०० वर्षांपूर्वीच्या संत साहित्यात दडलेलं आहे. 'तैसी मुक्ताबाई आम्हांमधी' पुस्तकाच्या लेखिका डॉ. रूपाली शिंदे यांच्यासोबतचा संवाद या दुसर्‍या भागातही आपण चालू ठेवतोय.

    डॉ. शिंदे सांगतात की संत साहित्य म्हणजे केवळ पूजा-अर्चा नव्हे, तर ते जगण्याचं बळ देणारं सत्व आहे. नरोटीची उपासना करण्यापेक्षा त्यातील खोबरं (तत्वज्ञान) जास्त महत्त्वाचं आहे. मुक्ताबाई, जनाबाई आणि बहिणाबाई या केवळ संतांच्या रांगेतल्या मूर्ती नाहीत, तर त्या आधुनिक स्त्रीच्या मनाचा 'आरसा' आहेत. या आरशात पाहताना आपल्याला कुठलाही मेक-अप किंवा मुखवटा लागत नाही. 'मुंगी उडाली आकाशी' सारख्या कूट रचनांमागे मागे दडलेला गूढ अर्थ आणि मुक्ताईंचे 'आदिमाया' रूप उलगडून दाखवणारा हा विशेष भाग जरूर पहा.
    एपिसोडमधील महत्वाचे मुद्दे:
    ताटीचे अभंग: स्वतःच लावलेली ताटी आधुनिक स्त्रीने किंवा पुरुषांनी कशी उघडायची ?
    वसंत बापट ते बहिणाबाई या वेगवेगळ्या काळातील कवींनी मुक्ताईच्या 'योग सामर्थ्याला' कसे शब्दबद्ध केले आहे?
    मुक्ताबाईंचे वारकरी संप्रदायासाठी योगदान काय आहे? ग्रेस यांच्या कवितेत आणि मुक्ताईच्या अभंगात काय साम्य आहे? प्रज्ञा दया पवार आणि सरिता पत्की यांच्या कवितांतून मुक्ताई कशी भेटते?
    जगण्याचे भान: एआय AI च्या युगात संत साहित्याचे 'गुगल मॅप' आपल्याला कसे दिशा देऊ शकते?
    लेखिकेचा प्रवास: आकाशवाणीच्या लेखनापासून ते संत साहित्याच्या गाभ्यापर्यंतचा डॉ. रूपाली शिंदेंचा रंजक प्रवास.

    डॉ. रूपाली शिंदे यांनी लिहिलेली पुस्तके ग्रंथप्रेमी वेबसाइट वरुन घरपोच मागवण्यासाठी खालील लिंक वापरा :-
    https://granthpremi.com/collections/dr-rupali-shinde

    59 min
  • ताटी उघडा ज्ञानेश्वरा हा उपदेश करणार्‍या मुक्ताबाई - भाग 1 | Dr. Rupali Shinde Podcast | Granthpremi मराठी

    संत ज्ञानेश्वर महाराजांना उपदेश करणारी अवघी 10 वर्षाची धाकटी मुक्ताई आणि ताटीचे अभंग माहीत नाहीत असा मराठी माणूस विरळाच! मुक्ताबाई, नामदेव महाराज आणि योगी चांगदेव यांच्याही गुरु होत्या. ते सर्व प्रसंग आपण जाणतोच. पण हे प्रसंग केवळ दंतकथा किंवा सिद्धी नाहीत त्यामागे खूप व्यापक आणि सर्व समाजाला उपयोगी असा खोल विचार आहे आणि म्हणून त्या संप्रदायाचे प्रेरणास्थान आहेत. या प्रत्येक कथेतून, मुक्ताबाईंकडून आपण नेमके काय शिकू शकतो? हे आपल्याला सांगताएत प्राध्यापक डॉ. रूपाली शिंदे. पॉडकास्टच्या या पहिल्या भागात आपण खालील मुद्यांवर चर्चा केली आहे:

    * भक्ति ही एकट्या व्यक्तीचा उत्कर्ष साधण्यासाठी आहे का ?
    * स्त्री मुक्तीचा पासवर्ड म्हणजे ताटी उघडा ज्ञानेश्वरा ?
    * मुक्ताबाईंनी वारकरी संप्रदायाला नैतिकता कशी दिली ?
    * मुक्ताबाईंचे साहित्य आणि त्यांचे विचार म्हणजे थेरपी आहे का ?
    700 वर्षे लोटून गेली तरी "ताटी उघडा ज्ञांनेश्वरा" ची गोडी आजही टिकून आहे आणि मुक्ताबाईंच्या कूट रचना नवीन पिढीला साद घालतात, ते का ? हे जाणून घ्यायचे असेल तर हा एपिसोड नक्की बघा!


    डॉ. रूपाली शिंदे यांनी लिहिलेली पुस्तके ग्रंथप्रेमी वेबसाइट वरुन घरपोच मागवा

    अथवा खालील नंबर वर संपर्क करा

    WhatsApp Message Only : +91 85509 31939

    स. 10.30 ते स. 6

    1 hr 4 min

About ग्रंथप्रेमी - Granthpremi

From the publisher's feed

ग्रंथप्रेमी - मराठी साहित्यावरील पॉडकास्ट! www.granthpremi.com हा पॉडकास्ट सर्व मेजर पॉडकास्टिंग प्लॅटफॉर्म्स वर उपलब्ध आहे. फॉलो करा - https://linktr.ee/granthpremi