फोनिक्स म्हणजे अक्षरांचा उच्चार, त्या अक्षरांचे वाचन त्यांची जुळवणी करून तयार झालेल्या शब्दाचे वाचन आणि शब्द जुळवून क्रमाने तयार केलेल्या त्या वाक्याचे वाचन. एकंदरीत इंग्रजी अक्षरे, शब्द आणि वाक्य त्यांच्या अर्थासहित वाचायला, लिहायला व बोलायला येणे. नक्कीच, फोनिक्स हा इंग्रजी भाषेचा पाया आहे. फोनिक्स (sounds of speech) समजणे खूपच महत्वाचे आणि गरजेचे आहे. अन्यथा इंग्रजी वाचणे जवळ जवळ कठीणच होते. आणि त्या भाषेची भीतीही नाहक वाढली जाते. इंग्रजी वाचता, लिहिता व बोलता येण्याकरिता फोनिक्स हे खूपच महत्वाचे आहे. आम्ही ज्या प्रकारे फोनिक्स शिकवतो त्यायोगे मुलांना अभ्यास हा अभ्यासासारखा वाटतच नाही. शिकताना त्यातला आनंद ते अगदी मनापासून घेतात, आणि हा अनुभव आम्हालाही खूप समाधान देतो. मुले अगदी समरसून शिकतात, याचे गमक म्हणजे मुलांना एखादी अवघड गोष्ट सोपी करून सांगितली व त्या विषयाची त्यांची भीती गेली की मग खुपश्या गोष्टींमधला आनंद ते घेऊ शकतात. याचा परिणाम त्यांच्या प्रगतीवर एकंदरीत त्यांच्या सर्वांगीण विकासावर होतो. कारण उच्चारणातून भाषा, भाषेतून संभाषण आणि संभाषणातून सर्वांगीण विकासाला हातभार!!!