सयुंक्त महाराष्ट्राचा जिथे विजय झाला, जिथे अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती देउन महाराष्ट्राची देशाची ओळख साऱ्या जगाला करुन दिली. City of Gold म्हणून ओळखली जाणारी आपली मायानगरी म्हणजेच मुंबई. अनेक वर्ष आपण पुस्तक,एकांकिका, नाटक,सिनेमा मधून ह्या शहराची पाळ मूळ ऐकत बघत असतो पण खरोखरच त्याचं validation करुन अभ्यास करुन जास्त खोल जायचा प्रयत्न खूप कमी व्यक्ती करतात. नमस्कार माझं नाव समाधान रावजी यादव, baygya ह्या यूट्युब चॅनेल वर तुमच सर्वांचं स्वागत आहे. आपण आज पासून आपल्या चॅनल वर विविध क्षेत्रातील मान्यवरांची मुलाखत घेऊन त्यांचे अनुभव,किस्से आणि त्यातुन आपण काही नविन शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज आपल्या सोबत आहेत मराठी ब्लॉगर नितीन साळुंखे सर. नितीन साळुंखे लिखित व मनोविकास प्रकाशन प्रकाशित 'अज्ञात मुंबई' हे पुस्तक मुंबंई, ठाणे व महाराष्ट्रातील पुस्तकांच्या सर्व प्रमूख दुकानांतून उपलब्ध आहे.