ब्रिटिश आणि अमेरिकानांनी मध्यपूर्वेतील सत्ता अंकित राहण्यासाठी इस्लामिक मूलतत्त्ववादी विचारसरणीला जोपासलं. प्रोत्साहन दिले. एकमेकांना एकमेकांचे वैरी बनवून संघर्षरत ठेवलं. बदल्यात तेल ओरपल आणि अतोनात पैसा कमावला. जगाची पोलिसगिरी करतोय अस भासवले. हे सगळं करत असताना या दहशतवादी भस्मासुराचा हात आपल्या डोक्यावर पडेल अशी कल्पना त्यांनी स्वप्नातही केली नव्हती. डाव्या विचारसरणीला विरोध करता करता विवेक गमावला. त्याची फळ आज जग मागतोय. सरळमार्गी, गरीब, लोकशाही मार्गाने चालणाऱ्या सामान्य इस्लामिक जगतालाही बसला. या पुस्तकात हा विस्तृतपणे या सर्व इतिहासाचा आढावा कुबेरानी घेतला आहे. हे पुस्तक वाचून आपल्याला दहशतवादाचे अनेक बिंदू जोडून सर्व चित्र स्पष्ट होते.