मराठी ढंगाचे शब्दप्रयोग ही आपल्या भाषेची श्रीमंती आहे. मराठीत "मारणे' हे एक क्रियापद घेतले तर ते किती वेगवेगळ्या प्रकारे वापरले जाते, हे लक्षात घेण्याजोगे आहे. जसे, गप्पा मारणे, थापा मारणे, टिचकी मारणे,शिट्टी मारणे, पाकीट मारणे, जेवणावर ताव मारणे,(पोहताना)हातपाय मारणे, माश्या मारणे इत्यादी. "मारणे' म्हणजे "मार'देणे हा अर्थ यात कोठेही आलेला नाही. हिच तर भाषेची गंमत असते.