ग्रंथप्रेमी - Granthpremi

Book Reading - मस्तानी कुलवती की कलावंतीण - काही प्रश्न


Listen Later

विषय -  "मस्तानी कुलवती की कलावंतीण - काही प्रश्न" या प्रकरणाचे अभिवाचन  - "देवयोद्धा" या  महाकादंबरी मधुन.
पुस्तकाचे नाव - देवयोद्धा 
प्रकार - ऐतिहासिक, थोरले बाजीराव पेशवे यांच्या जीवनावरील त्रिखंडात्मक महाकादंबरी 
लेखक -  श्री काका विधाते 
प्रकाशन - प्रफुल्लता प्रकाशन 

देवयोद्धा - हे पुस्तक म्हणजे, श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या दैदीप्यमान जीवनावरील त्रिखंडात्मक महाकादंबरी आहे. थोरले बाजीराव पेशवे यांच्या समग्र जीवनाचा आणि सन १६८९ ते १७४० या ५२ वर्षांत मराठ्यांनी साम्राज्य निर्माणाचा जो प्रचंड खटाटोप केला त्या प्रयत्नपर्वाचा वेध घेणारे हे पुस्तक आहे. थोरले बाजीराव पेशवे म्हणजे पराक्रमात  तेजाने तळपलेलं एक झुंझार, झंझावाती आयुष्य ! अनेक अस्सल ऐतिहासिक संदर्भ साधनांचा शोध घेऊन आणि इतिहासाशी प्रमाण राखून तो झंझावात कवेत घेण्याचा हा एक प्रयत्न प्रसिध्द कादंबरीकार काका विधाते ह्यांनी त्यांच्या ह्या महाकादंबरीत केला आहे. या महाकादंबरी संचात ३ खंड आणि एक पुस्तिका आहे. ३ खंडात संपुर्ण कादंबरी सामावलेली आहे, तर पुस्तिकेत अनेक इतिहासकारांच्या बाजीरावांवरील प्रतिक्रिया, बाजीरावांच्या जीवनाचा कालानुक्रम, मस्तानी कुलवती की कलावंतीण या बद्दलचे विचार, नकाशे, छायाचित्रे, वंशावळ व इत्यंभुत संदर्भसुची दिलेली आहे. त्यामुळे हि बाजीराव पेशवेंच्या जीवनावरील एक भूतो न भविष्यति अशी एक महाकादंबरी ठरलेली आहे.

पुस्तक विकत घेण्यासाठी - https://granthpremi.com/products/devyoddha

#neemtreelabs #bookreview #marathibooks #marathiauthors #granthpremi #KakaVidhate 
#काकाविधाते  #ग्रन्थप्रेमी #मराठीपुस्तके #अभिवाचन #मराठीलेखक #देवयोद्धा 

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

ग्रंथप्रेमी - GranthpremiBy Dwitiya Sonawane