ग्रंथप्रेमी - Granthpremi

Book Review - एका रानवेड्याची शोधयात्रा (Eka Ranvedyachi Shodhyatra)


Listen Later

विषय -  "एका रानवेड्याची शोधयात्रा - कृष्णमेघ कुंटे" या पुस्तकाचे श्री दिलीप निंबाळकर यांनी केलेले परीक्षण  "नाते निसर्गाशी" या  पुस्तकामधून  मधुन.
पुस्तकाचे नाव - 
१. एका रानवेड्याची शोधयात्रा - कृष्णमेघ कुंटे - राजहंस प्रकाशन 
२. नाते निसर्गाशी - श्री दिलीप निंबाळकर - प्रफुल्लता प्रकाशन 
प्रकार - प्रवासवर्णन, निसर्ग विषयक, पर्यावरण 

एका रानवेड्याची शोधयात्रा - कृष्णमेघ कुंटे यांच्यासारखेच एखादे वेड आपल्यालाही लागावे, असे तीव्रतेने वाटावे, असे त्यांचे हे पुस्तक आहे. या रानवेड्याच्या शोधयात्रेतूनच एक संशोधकाचा जन्म झाला आहे.मदुमलाईच्या जंगलातील हा विलक्षण अनुभव आहे. मदुमलाईचा परिसर, मासिनागुडी, अनाईकट्टी, हत्तींचे रास्ता रोको, वीरप्पन, रानकुत्री,मासेमारी, कुडकोबन आदी प्रकरणांतून मदुमलाईचे जंगल उलगडत जाते.

नाते निसर्गाशी - सुमारे ३५ नामवंत निसर्ग अभ्यासक व कार्यकर्ते, यांच्या पन्नासावर पुस्तकांच्या मनस्वी धांडोळा घेणारे हे लेखन आहे. त्यामध्ये  बहुसंख्य मराठी लेखकांच्या पुस्तकांचा समावेश असून काही परभाषिक साहित्यिकांच्या अनुवादित लेखनाचाही अंतर्भाव केलेला आहे. पर्यावरण आणि निसर्ग क्षेत्रातील, व्यासंगी लेखकांची या पुस्तकातील मांदियाळी बघून आणि आणखीही कितीतरी राहिलेल्यांचा विचार करता, मायमराठी राजभाषेतील, निसर्गसाहित्यही किती समृद्ध आहे, याची सुखद जाणीव आपल्याला प्रसन्न करते. हे पुस्तक सर्व विद्यालय - महाविद्यालयात आणि हरेक ग्रंथालयात असलेच पाहिजे असे माझे आग्रही मत आहे. 
श्री.  द.  महाजन

To buy these books online, Pls. visit - https://granthpremi.com/products/nate-nisrgashi


#bookreview #marathibooks #marathiauthors #granthpremi  #dilipnimbalkar #krushnmeghkunte  #DwitiyaSonawane #ekaranvedyachishodhyatra  #natenisargashi 
#ग्रंथप्रेमी #मराठीपुस्तके #अभिवाचन #मराठीलेखक #दिलीपनिंबाळकर #कृष्णमेघकुंटे #एकारानवेड्याचीशोधयात्रा #नातेनिसर्गाशी

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

ग्रंथप्रेमी - GranthpremiBy Dwitiya Sonawane