छातीत गाठी होऊ नयेत यासाठी प्रतिबंधात्मक ताडासन,अर्धचक्रासन,कटिचक्रासन, वीरासन,शशांकासन,उष्ट्रासन,भुजंगासन, धनुरासन, नौकासन, सूर्यनमस्कार या सारख्या क्रिया कराव्या लागतील. दीर्घश्वासोच्छ्वास, कपालभाती, नाडीशुद्धी इ. प्राणायाम व त्याचबरोबर प्रतिकार शक्ती वाढविणारी पपई, डाळींब, आवळा, लिंबू, संत्री, मोसंबी, आमसूल, कवठ इ.सारखी फळे आहारात घ्यावी लागतील.