नाशिकमधील कॉम्प्युटर इंजिनियर असलेल्या अक्षय दीक्षित यांनी कृषी व्यवसायाशी निगडीत 'वेसाटोगो नावचे स्टार्टअप सुरु केले. अवघ्या चार वर्षांत कंपनीने अनेक यशोशिखरं गाठली आहेत. कंपनीकडून शेती व्यवसायावर आधारित उत्पादने तयार करण्यात आली आहेत. या उत्पादनांचा वापर फार्मर प्रोड्युसर कंपन्या, निर्यातदार तसेच व्याव्सायीकांकडून केला जात आहे. अक्षयने त्याच्या टीमसोबत आता कंपनीची व्याप्ती वाढविण्यास सुरुवात केली आहे. अनेक वेगवेगळे प्रयोग तो शेती व्यवसायात करू पाहत आहे. अक्षयला मुळात जायचे होते लष्करात परंतु तांत्रिक कारणामुळे तो भरती होऊ शकला नाही. तेव्हापासूनच त्याने जय जवान सोबत जय किसानला प्राधान्य दिले. शिक्षणाच्या जोरावर जय विज्ञान म्हणत आज तो बळीराजाला अपडेट करत आहे. अशा या अनोख्या व्यक्तीमत्वाशी देशदूतचे प्रतिनिधी दिनेश सोनवणे यांनी साधलेला संवाद....