शिंदखेडा तालुक्यातील रामी येथे राहणारे रामा वेडू माळी यांच्या मालकीच्या शेतात मशागत करतांना प्राचीन काळातील धातूचे चारमुखी, 11 इंचचे लहान जैन मंदिर त्यांचे भाचे डिगंबर गंगाराम माळी यांना आढळून आले. याबाबत दोंडाईचा पोलिसांना त्याची माहिती देण्यात आली. मंदिर पाहण्यासाठी गावातील नागरिकांनी गर्दी केली होती. दोंडाईचा मंडळ अधिकार्यांनी पंचनामा केला असून मंदिर दोंडाईचा पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहे. मंदिराचे वजन चार किलो 250 ग्रॅम एवढे आहे. मंदिरात प्रमुख चार भगवंतांच्या मूर्ती असून 48 जैन भगवंतांच्या लहान मूर्ती आहेत.