शहरातील पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर विद्युत रोहित्रात हात घालून एका जणाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना 9 जानेवारी रोजी सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास घडली. सतर्क वाहतूक शाखेच्या कर्मचार्यांसह पोलीस अधीक्षक कार्यालयात बॉम्ब शोध पथकात कार्यरत कर्मचार्यांनी आत्महत्येच्या प्रयत्नातील प्रौढाचे प्राण वाचविले आहेत. कैलास नारायण भांगे (46,रा. साई इजारा, ता. महागाव,जि.यवतमाळ) असे आत्महत्येचा प्रयत्न करणार्या प्रौढाचे नाव आहे.