शहरातील शिवराम नगर येथील निवास्थानावरून आज दुपारी साडेतीनच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे मुंबईच्या दिशेने रवाना झाले. भोसरीतील भूखंड व्यवहार प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने नोटीस बजावल्याने ते येत्या बुधवारी मुंबईत चौकशीसाठी उपस्थित राहणार आहेत. मुंबईला जाण्यापूर्वी ते नाशिकला निकटवर्तीयांच्या लग्नसमारंभाला उपस्थित राहणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. नाशिक येथून ते थेट मुंबईला जाण्याची शक्यता आहे.