स्प्राऊटींग सीड आंतरराष्ट्रीय लघूच़ित्रपट महोत्सवात दाखवण्यात आलेल्या निवडक लघूचित्रपटाला रसिक प्रेक्षकांची उत्स्फूर्त दाद मिळाली. महोत्सवाचे उदघाटन आदिवासी देवमोगरा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा कला अकादमीचे अध्यक्ष राजेंद्रकुमार गावित यांच्या हस्ते करण्यात आले. विविध विषयांवर भाष्य करणार्या चित्रपटांमुळे रसिकांना मेजवानी मिळाली.