नंदुरबार येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मध्ये खरेदी-विक्रीचा व्यवहार बंद असल्याने आज संतप्त झालेल्या शेकडो मिरची उत्पादक शेतकर्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयाकडे वळले. तेथे अर्धा तास गोंधळाचे वातावरण सुरु होते. यावेळी उपस्थित शेतकर्यांनी मिरची लिलावाची मागणी केली. अखेर माजी आ. चंद्रकांत रघुवंशी यांनी त्यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत तोडगा काढल्यानंतर दुपारी २ वाजता लिलाव प्रक्रियेला सुरुवात झाली. दरम्यान, कामबंद आंदोलनाचा अंतिम निर्णय उद्या बैठक निघण्याची शक्यता आहे.