गेल्या सहा सात महिन्यानंतर प्रथमच जिल्ह्यातील बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण दिसू लागले आहे. जिल्हयासह तालुकास्तरावर दिवाळीनिमित्ताने फटाका बाजारपेठादेखील सजल्या होत्या. परंतु सुमारे दोन ते अडीच कोटी रुपयांच्या फटाक्यांची आयात करण्यात आली असली तरी या नेहमीपेक्षा यावर्षी फटाका बाजारपेठेला कोरोनाचा फटका बसला आहे. दरवर्षी तीन ते पाच कोटींच्यावर होणारी उलाढाल केवळ दीड ते दोन कोटी झालेली असल्याचे स्थानिक व्यापार्यांनी सांगीतले.