नंदुरबार नगर परिषदेने उभारलेल्या स्व.बाळासाहेब ठाकरे जलतरण तलावाच्या माध्यमातून ऑलिम्पिक पदक मिळविणारे खेळाडू घडवावे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. नंदुरबार नगर परिषदेच्या प्रशासकीय इमारतीचे ई-भूमीपूजन आणि स्व.बाळासाहेब ठाकरे जलतरण तलावाचे ई-लोकार्पण श्री.ठाकरे यांच्या हस्ते दूरदृष्य प्रणालीद्वारे करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.