नंदुरबार पोलीस दलाचा ‘एक आरोपी एक पोलीस’ हा उपक्रम स्तुत्य असून हा उपक्रम राज्यात सुरु करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले. दरम्यान, महिलांवर होणार्या अत्याचाराला प्रतिबंध करण्यासाठी आणि गुन्हेगारांना लवकर कडक शिक्षा मिळावी यासाठी कडक कायदा करण्यात येईल. तसेच सारंगखेडा येथील घटनेशी संबधित आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी हे प्रकरण जलदगती न्यायालयात नेण्यासंदर्भात आवश्यक कार्यवाही करण्यात येईल आणि त्यासाठी तज्ज्ञ वकीलाची नेमणूक करण्यात येईल, असेही ना.देशमुख यांनी सांगितले.