जळगावसह तीन जिल्ह्यांना पाणीपुरवठा करणारे गिरणा धरण परिक्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे ते 95 टक्के भरले आहे. धरण क्षेत्रात सातत्याने पाऊस सुरु असल्याने येत्या 24 तासांत धरणातून कुठल्याही क्षणी पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा पाटबंधारे विभागाकडून देण्यात आला आहे. धरण परिक्षेत्रात पाऊस राहिला तर ते 100 टक्के भरण्याची दाट शक्यता असून तब्बल दहाव्यांदा शंभरी गाठणार आहे.