देशभरात करोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असल्यामुळे सर्व उद्योग व्यवसायाबरोबरच शेती व्यवसायही अडचणीत सापडला आहे. अशा परिस्थितीत शेतकर्यांना आधार देण्याच्या दृष्टीने अहमदनगर जिल्हा बँकेच्यावतीने निर्णय घेण्यात आला आहे. यावर्षी शेतकर्यांना तीन लाख रुपयांपर्यंत पीक कर्ज शून्य टक्के व्याजदराने देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा बँकेचे चेअरमन सिताराम पाटील गायकर यांनी दैनिक सार्वमतशी बोलताना दिली.