"मागणे हे एक रामा आपुल्या द्या पादुका!" हे भरताने अत्यंत काकुळतीने मागितलेले दान प्रभू श्रीराम नाकारू शकले नाहीत. भरताने त्या पादुकांना राज्याभिषेक केला आणि स्वतः त्या राज्याचा कारभारी म्हणून कारभार पाहू लागले. इकडे प्रभू श्रीरामाने चित्रकूट सोडला आणि ते दक्षिणेला निघाले. वाटेत त्यांनी अनेक राक्षसांचा नायनाट केला .10 वर्षानंतर ते गोदावरी तटावर पंचवटीत आले. एकदा या पर्णशाळेच्या ओट्यावर प्रभू श्रीराम,बंधू लक्ष्मण आणि माता जानकी सह वार्ता विनोद करत असताना एक अद्भुत स्त्री तिथे आली .ती प्रभू श्रीरामांना न्याहाळत हलके हलके मंजुळ स्वर काढत प्रभू श्रीरामांना काय म्हणाली ? ऐकू या ......
कोण तू कुठला राजकुमार !गीत# रामायण भाग 28
जय #श्रीराम!@harshaseartreat.