"मज आणून द्या तो हरिण अयोध्या नाथा"या सीतेच्या हट्टासाठी श्रीराम धनुष्यबाण घेऊन त्या मृगाचा मागोवा घेत धावले .रामाचा बाण वर्मी लागताच तो मायावी मारीच "हा सीते, हा लक्ष्मणा, धाव धाव" असं मानवी वाणीने ओरडला.त्यामुळे सीतेने लक्ष्मणाला श्रीरामांच्या शोधार्थ पाठवलं. आश्रमात ती एकटीच उरली. ती संधी साधून यतीवेश धारण केलेला रावण पुढे झाला आणि तिच्याशी लगट करू लागला .तेव्हा ती महापतिव्रता मैथिली त्याला कातर स्वरांनी काय बजावू लागली ?.....
ऐकूया .....
"#याचका थांबू नको दारात"|#गीतरामायण |भाग 31
#जयश्रीराम|@harshaseartreat