"आश्रया गुहेकडे जानकीस पाठवा
चापबाण घ्या करी सावधान राघवा "अशा प्रकारे प्रभू श्रीरामांना' सावधान 'अशी सूचना देणारा लक्ष्मण भरतावर धावून जातो तेव्हा प्रभू श्रीरामांनी त्याला परत शांत केले .भरत वेड्यासारखीच प्रभू श्रीरामांच्या चरणांना मिठी घालतो. आणि पित्याच्या निधनाची वार्ता देऊन प्रभू श्रीरामांना परत परत अयोध्येस येण्यासाठी विनंती करू लागला तेव्हा त्याचे सांत्वन करून प्रभू श्रीराम त्याला काय म्हणतात ऐकू या....
"पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा
दोष ना कुणाचा!"