"थांब सुमंता थांबवि रे रथ" ही नगरजनांची प्रार्थना श्रीरामांचा रथ अडवू शकली नाही .बंधू लक्ष्मण आणि पत्नी जानकी यांच्यासह श्रीराम अयोध्येच्या बाहेर पडले .श्रीराम गंगातीरी शृंगवेरपुरास आले. निषादाधिपती गुहानं श्रीरामांचं दर्शन घेतलं आणि अत्यंत भक्तीनं त्यांचं आदरातिथ्य केलं. श्रीराम सीता लक्ष्मणासह नौकेमध्ये चढले . नावाडी नौका वल्हवू लागले .लाटांवर लाटा आढळू लागल्या आणि नौका वल्हवता वल्हवता गुहासह त्याचे नावाडी गाऊ लागले, म्हणू लागले .......
"नकोसं नौके परत फिरू ग नकोस गंगे उर भरू"