गीत रामायण!
'जेथे राघव तेथे सीता' या सीतेच्या निश्चयापुढे श्रीराम काय बोलणार.... प्रभू श्रीराम, बंधू लक्ष्मण आणि माता जानकी तिघेही वल्कले धारण करून सर्वांचा निरोप घेऊन वनवासाला निघाले. सुमंत मंत्री त्यांच्या रथावर बसला .आज सारी अयोध्या नगरी अत्यंत शोकमग्न अवस्थेत घराबाहेर पडली आहे . मंत्री सुमंताला हाक मारून मारून ते प्रभू श्रीरामांचा रथ थांबविण्याची विनंती करत आहेत आणि म्हणत आहेत....
थांब सुमंता थांबविरे रथ!