"या इथे लक्ष्मणा बांध कुटी "या प्रभू श्रीरामांच्या आज्ञेप्रमाणे लक्ष्मणाने शाखा पल्लवांची जमवाजमव करून सुंदर कुटी उभी केली. प्रभू श्रीराम ,माता सीता आणि लक्ष्मण तिघांनीही कुटीमध्ये प्रवेश केला. प्रभू श्रीरामांची आज्ञा घेऊन मंत्री सुमंत अयोध्येस परत आला. सुमंत परत आल्याचे पाहताच अश्रू भरल्या डोळ्यांनी महाराज दशरथ त्याला विचारू लागले, "माझा राम काय रे म्हणाला जाताना? "तेव्हा खालच्या मानेने सुमंत महाराज दशरथांना काय सांगतात ......ऐकू या......
"शेवटी करिता नम्र प्रणाम बोलले इतुके मज श्रीराम!"
#गीत रामायण