गप्पांगण

कथा शिवचरित्रगानाची


Listen Later

शिवाजी महाराजांचा किंवा कुठलाही इतिहास आपल्याला नेमका कसा माहिती होतो? इतिहासाला कोणकोणत्या बाजू असतात? साधनांचा अभ्यास म्हणजे इतिहास संशोधन का? की अजून काही? बरेचदा एखाद्या घटनेचा खरा इतिहास असा आहे, अशा आशयाचं लिखाण वाचायला मिळतं. इतिहास असा खरा किंवा खोटा आहे हे समजायचं कसं? असे अनेक प्रश्न मला खूप दिवसांपासून होते. जेव्हा पॉडकास्ट सुरू केला तेव्हा ह्या विषयावर सुद्धा गप्पा मारायच्या होत्या आणि तो योग नुकताच जुळून आला. इतिहासाचा एक डोळस अभ्यासक असणारा डॉ सागर पाध्ये ह्याच्यासोबत ह्याच विषयावर गप्पा मारल्या. मराठ्यांचा इतिहास, त्याच्या अभ्यासाची साधने कोणती, ती उपलब्ध करण्यासाठी कोणत्या इतिहासकारांनी किती मेहनत घेतली ह्या आणि अशा अनेक प्रश्नांची विस्तृत आणि अभ्यासपूर्ण उत्तरं त्यानं दिली.. इतिहासाचा अभ्यास करण्याची ज्यांना इच्छा आहे, ज्यांना इतिहासाची आवड आहे त्यांच्यासाठी अत्यंत मोलाची माहिती असणारा हा पॉडकास्ट, त्याचा हा पहिला भाग.

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

गप्पांगणBy अमोल कुलकर्णी