Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
विषयांचं बंधन नसलेल्या, डिजिटल अंगणात मारलेल्या अघळपघळ गप्पा! आपल्या सूचना, अभिप्राय आपण [email protected] ह्या पत्त्यावर पाठवू शकता..... more
FAQs about गप्पांगण:How many episodes does गप्पांगण have?The podcast currently has 27 episodes available.
October 02, 2024तुम्ही इंजिनियर आहात का?ह्यावर्षीच्या अभियंता दिनाचं निमित्त साधून गप्पा मारण्यासाठी बोलावलं होतं 2 अगदी भिन्न अभियंत्यांना! राजेश सर गेल्या ३५ वर्षांपासून ह्या क्षेत्रात आहेत. नोकरी पासून सुरू झालेला त्यांचा प्रवास एक यशस्वी उद्योजक म्हणून दमदार सुरू आहे तर दुसरीकडे अमेरिकेत असलेली आयटीची नोकरी हे कित्येकांचं असलेले स्वप्न जगून झाल्यानंतर ते सोडून देऊन शिक्षण क्षेत्रात काम करणारी तरन्नुम अशा दोघांसोबत ह्या क्षेत्राविषयी अघळपघळ गप्पांचा हा भाग!...more1h 27minPlay
February 25, 2024चला कचरा आणि प्लास्टिकमुक्त भविष्याकडे..आदिती देवधर ह्यांच्यासोबतच्या गप्पा!गावोगावी असणारे आणि रोज वाढत जाणारे कचऱ्याचे डोंगर, केवळ निसर्गातच नव्हे तर थेट मानवी रक्तात पोचलेलं प्लास्टिक आणि त्यातून निर्माण झालेला समस्येचा भस्मासुर आपलं आणि येणाऱ्या पिढ्यांचं भविष्य नष्ट करणार आहे हि भीती अनेक तज्ञ कित्येक वर्षांपासून सांगत आहेत. ह्या परिस्थितीत कचरा आणि प्लास्टिक ह्यांच्यापासून मुक्त असणाऱ्या भविष्याची शक्यता विविध उपक्रमातून प्रत्यक्षात आणणाऱ्या आदिती देवधर ह्या क्षेत्रात अनेक वर्षांपासून काम करत आहेत. त्यांच्या कल्पक उपक्रमांसोबत अनेक लोक जोडल्या गेले आहेत. गप्पांगणच्या ह्या भागात ह्याविषयी त्यांच्यासोबत विस्तृत गप्पा मारल्या. आणखी जाणून घेण्यासाठी हा भाग नक्की ऐका आणि कसा वाटला ते कळवा. ...more1h 38minPlay
February 11, 2024निरोगी नव्वदीचा मार्ग.. मिलिंद पदकी ह्यांच्यासोबतच्या गप्पा!दीर्घ आणि निरोगी आयुष्य कसं मिळवता येईल ह्याच संशोधन जगभर सुरु आहे. आतापर्यंतच्या संशोधनातून बऱ्याच बाबी समोर आल्या आहेत. ह्या सर्वांचा अभ्यास करणारे ज्येष्ठ संशोधक मिलिंद पदकी ह्यांच्यासोबत ह्या भागात मारलेल्या गप्पांमधून त्यांनी ह्याविषयी विस्तृत माहिती दिली. आहार, व्यायाम आणि झोप ह्या त्रिसूत्रीतून निरोगी नव्वदी कशी गाठता येईल, अनेक विकार आणि आजार कसे दूर ठेवता येतील, रोजच्या आयुष्यात छोट्या बदलांमधून कशी शिस्त लावता येईल, अशा अनेक बाबींवर झालेल्या निवांत गप्पांचा हा भाग! तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया [email protected] किंवा ९४०५३६७८४३ ह्या क्रमांकावर कळवू शकता. ...more1h 22minPlay
January 31, 2024मराठीचा मानबिंदू, गीतरामायण! दत्तप्रसाद जोग ह्यांच्यासोबतच्या गप्पा!गीतरामायण म्हणजे मराठीतलं एक अप्रतिम काव्य. आधुनिक वाल्मिकी म्हणून ओळखले जाणारे ग दि माडगूळकर ह्यांची हि रचना श्री सुधीर फडके ह्यांनी संगीतबद्ध केल्यानंतर पुणे आकाशवाणीवरून १९५५ मध्ये ह्याच प्रसारण झालं आणि ते घराघरात पोचलं. श्री दत्तप्रसाद जोग ह्यांनी ह्या काव्याचा हिंदीमध्ये अनुवाद केला आहे. काव्य म्हणून गीतरामायण विशेष असं आहे. जोग ह्यांच्यासोबतच्या गप्पांमधून ह्या काव्याची वैशिष्ट्ये काय आहेत हे त्यांनी सांगितलं. जोडीला त्याचा हिंदी अनुवाद करताना असणारी आव्हानं, त्याला संगीतबद्ध करताना आलेले छान अनुभव त्यांनी मांडले. गदिमांच्या अलौकिक प्रतिभेतून साकारलेल्या ह्या काव्यात असणारी सौंदर्यस्थळं ह्या गप्पांमध्ये ऐकता येतील. गप्पा कशा वाटल्या ते नक्की सांगा. ...more1h 51minPlay
January 15, 2024कारगिल युद्धस्य कथाकारगिल युद्धाचं हे २५वं स्मरणवर्ष. अत्यधिक उंचीवर लढलं गेलेलं हे युद्ध अनेक अंगांनी वैशिष्ट्यपूर्ण होतं. मेजर मोहिनी गर्गे (नि.) ह्यांनी ह्यानिमित्ताने कारगिल युद्धाची पार्श्वभूमी, प्रत्यक्ष युद्धभूमीवर घडलेला थरार, आंतरराष्ट्रीय परिस्थिती आणि भारतीय नेतृत्वाने मुत्सद्देगिरी आणि संयमाने हाताळलेली परिस्थिती, भारतीय सैन्याने दाखवलेला दैदिप्यमान पराक्रम ह्या आणि अशा अनेक मुद्द्यांवर गप्पा मारल्या. साऱ्या जगाने गौरवलेला हा पराक्रम युद्धशास्त्राच्या अभ्यास करणाऱ्या आणि प्रत्यक्ष युद्धभूमीवर काम केलेल्या गर्गे ह्यांच्यासोबत गप्पांगण मध्ये समजून घेता आला. त्याचा हा भाग. नक्की ऐका. जय हिंद! ...more1h 57minPlay
January 09, 2024अज्ञात पुण्याची सफर-भाग २..सुप्रसाद पुराणिक सोबतच्या गप्पा!पहिल्या भागात पुणे शहराचा ऐतिहासिक, राजकीय आणि शैक्षणिक इतिहास जाणून घेतल्यानंतर, दुसऱ्या भागात सुप्रसादने पुण्यातल्या गंमतीशीर आणि विचित्र अशा वेगवेगळ्या नावांमागे असणाऱ्या आख्यायिका, इतिहास सांगितला. पुण्यातली मंदिरं, तिथल्या देवता, पेठा, वेगवेगळे गेट ह्यांना पडलेल्या नावांमागे कुठे कथा आहेत, तर कुठे इतिहास, काही भयानक घटना सुद्धा आहेत. जोडीला अनेक ऐतिहासिक वास्तू, विविध धर्मियांची काही शे वर्षे जुनी प्रार्थनास्थळे आणि अशा अनेक अज्ञात जागांची सफर सुप्रसाद ने घडवली. त्या गप्पा ह्या भागात ऐकता येतील. कशा वाटल्या ते जरूर कळवा. ...more1h 30minPlay
January 06, 2024अज्ञात पुण्याची सफर, सुप्रसाद पुराणिक सोबत!महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी हि बिरुदावली मिरवणारं पुणं हे त्यापेक्षा कितीतरी जास्त गोष्टी, इतिहास आणि खुणा बाळगून आहे. ऐतिहासिक, शैक्षणिक, व्यापारी, राजकीय अशा अनेक ओळखी ह्या शहराला आहेत. सुप्रसाद पुराणिक हा पुण्याचा संशोधक आणि पुण्याचाही अभ्यासक. ह्या शहराच्या अंतरंगाचा अभ्यास करून त्याने ३ पुस्तकं लिहिली आहेत. त्याच्याशी मारलेल्या गप्पांच्या पहिल्या भागात ह्या शहराच्या पूर्णपणे अज्ञात असणाऱ्या कित्येक गोष्टी त्याने सांगितल्या. पार अश्मयुगापर्यंत जाणाऱ्या पुण्याच्या पाऊलखुणा ते आजपर्यंतचा प्रवास त्याने छान उलगडून सांगितला. ह्या गप्पा जरूर ऐका , कशा वाटल्या ते नक्की सांगा. ...more1h 8minPlay
December 11, 2023विशेष मुलांच्या जगात...Special Educator आकांक्षा देशपांडे ह्यांच्यासोबतच्या गप्पा!३-१० डिसेंबर ह्या आठवड्यात दरवर्षी जगभर दिव्यांग आणि बौद्धिक अक्षमता ह्याविषयी जनजागृती केली जाते. Special Educator असणाऱ्या आकांक्षा देशपांडे गेली १८ वर्षे जन्मतः विविध व्याधी असणाऱ्या मुलांना विशिष्ट शिक्षण देऊन सामान्य आयुष्य जगता यावं यासाठी प्रयत्न करत आहेत. अक्षमतेचे प्रकार कोणते,अशा मुलांच्या समस्या कोणत्या, त्यांना शिक्षण कशाप्रकारे दिल्या जाते? अशा विविध बाबींवर त्यांनी ह्या भागात गप्पा मारल्या. स्वमग्न, दिव्यांग, आणि इतर बौद्धिक अक्षमता असणाऱ्या मुलांच्या बाबतीत असलेले त्यांचे अनुभव हे एका वेगळ्याच जगाची ओळख करून देतात. हा भाग ऐका आणि कसा वाटलं ते नक्की कळवा. आपण आपल्या प्रतिक्रिया [email protected] ह्यावर पाठवू शकता. ...more1h 5minPlay
November 19, 2023पुस्तक वाचनाचं स्वरूपच बदलून टाकणाऱ्या Booklet Guy अमृत देशमुख सोबतच्या गप्पा!Making India Read असं ध्येय घेऊन Booklet नावाचं एक अभिनव App बनवलेल्या अमृतने आतापर्यंत हजारो पुस्तकं वाचली आहेत आणि ती पुस्तकं काही लाख लोकांपर्यंत पोचवली आहेत. CA चं शिक्षण पूर्ण केल्यानंतर आणि काही Start-ups च्या अपयशाचा अनुभव घेतल्यानंतर हे Mission कसं सुरु झालं ह्याची कथा खूपच प्रेरणादायी आहे. पुस्तकं एखाद्याच्या आयुष्यात कोणते बदल घडवून आणू शकतात ह्याचे काही अविश्वसनीय अनुभव अमृतने अगदी मनमोकळेपणाने गप्पांगणच्या डिजिटल अंगणात मांडले. जोडीला त्याच्या अभिनव App चा प्रवास, भविष्यातले प्लॅन्स, E-Books, Audiobooks अशा अनेक पैलूंवर झालेल्या गप्पांचा हा भाग, नक्की ऐका, कसा वाटला ते जरूर सांगा....more1h 22minPlay
October 27, 2023गप्पा आतापर्यंतच्या क्रिकेट विश्वचषकांच्या.. क्रिकेट ब्लॉगर आशुतोष रत्नपारखी सोबत!भारताचा अघोषित राष्ट्रीय खेळ असणाऱ्या क्रिकेटचा विश्वकप सध्या भारतात सुरु आहे. १९७५ पासून काही अपवाद वगळता दर ४ वर्षाला होणारी हि स्पर्धा अत्यंत थरारक अशीच असते. अनिश्चितता हा स्थायीभाव असणारा हा खेळ त्याची पदोपदी जाणीव करून देत असतो. त्यामुळे संपूर्ण सामन्यात एखादी घटना सामन्याचा निकाल पूर्णपणे बदलू शकते हे आपण कित्येकदा पाहिले आहे. अशा कितीतरी घटना प्रत्येक विश्वकप स्पर्धेत जागोजागी आहेत. ह्या सर्व घटनांचा आढावा गप्पांगणच्या ह्या भागात घेतला आहे क्रिकेट ब्लॉगर आशुतोष ह्याने. क्रिकेटचं विश्लेषण खुसखुशीत शैलीत लिहिणाऱ्या आशुतोषने १९८३ पासून ते २०१९ पर्यंतच्या प्रत्येक विश्वकप स्पर्धेत घडलेल्या जवळपास सगळ्या घटना तितक्याच छान शैलीत गप्पांमधून मांडल्या आहेत. त्या जरूर ऐका, कशा वाटल्या ते नक्की कळवा. [email protected] ह्या इमेल वर. धन्यवाद. ...more1h 55minPlay
FAQs about गप्पांगण:How many episodes does गप्पांगण have?The podcast currently has 27 episodes available.