Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
विषयांचं बंधन नसलेल्या, डिजिटल अंगणात मारलेल्या अघळपघळ गप्पा! आपल्या सूचना, अभिप्राय आपण [email protected] ह्या पत्त्यावर पाठवू शकता..... more
FAQs about गप्पांगण:How many episodes does गप्पांगण have?The podcast currently has 27 episodes available.
May 25, 2023कथा शिवचरित्रगानाची-भाग २पहिल्या भागात शिवचरित्राच्या साधनांची, ती शोधण्यासाठी स्वतःचं आयुष्य खर्ची घालणाऱ्या संशोधकांची आणि उपलब्ध असणाऱ्या शिवचरित्रांची माहिती आपण ऐकली. दुसऱ्या भागात ऐकुया त्यातल्याच एका अशा शिवचरित्राची कथा जी तितकीच रंजक, स्फूर्तीदायी आणि अविश्वसनीय वाटेल अशीच आहे. ग्रंथ, महानाट्य, व्याख्यानं, अशा ज्याप्रकारे शक्य होईल त्या सर्व मार्गानी शिवचरित्र येणाऱ्या कित्येक पिढ्यांपर्यंत पोचवणाऱ्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे ह्यांच्या राजा शिवछत्रपती ह्या ग्रंथाची निर्मितीकथा, डॉ सागर पाध्ये ह्यांच्याकडून! ...more1h 34minPlay
May 21, 2023कथा शिवचरित्रगानाचीशिवाजी महाराजांचा किंवा कुठलाही इतिहास आपल्याला नेमका कसा माहिती होतो? इतिहासाला कोणकोणत्या बाजू असतात? साधनांचा अभ्यास म्हणजे इतिहास संशोधन का? की अजून काही? बरेचदा एखाद्या घटनेचा खरा इतिहास असा आहे, अशा आशयाचं लिखाण वाचायला मिळतं. इतिहास असा खरा किंवा खोटा आहे हे समजायचं कसं? असे अनेक प्रश्न मला खूप दिवसांपासून होते. जेव्हा पॉडकास्ट सुरू केला तेव्हा ह्या विषयावर सुद्धा गप्पा मारायच्या होत्या आणि तो योग नुकताच जुळून आला. इतिहासाचा एक डोळस अभ्यासक असणारा डॉ सागर पाध्ये ह्याच्यासोबत ह्याच विषयावर गप्पा मारल्या. मराठ्यांचा इतिहास, त्याच्या अभ्यासाची साधने कोणती, ती उपलब्ध करण्यासाठी कोणत्या इतिहासकारांनी किती मेहनत घेतली ह्या आणि अशा अनेक प्रश्नांची विस्तृत आणि अभ्यासपूर्ण उत्तरं त्यानं दिली.. इतिहासाचा अभ्यास करण्याची ज्यांना इच्छा आहे, ज्यांना इतिहासाची आवड आहे त्यांच्यासाठी अत्यंत मोलाची माहिती असणारा हा पॉडकास्ट, त्याचा हा पहिला भाग. ...more1h 30minPlay
May 17, 2023पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त...!सिनेमाच्या विश्वातल्या आठवणी, रोजच्या जगण्यातला संबंध आणि बऱ्याच भन्नाट गप्पा पहिल्या भागात झाल्यानंतर दुसऱ्या भागात अमोलच्या न नायक आणि मिडनाईट मॅटिनी ह्या दोन पुस्तकांच्या जडणघडणीची कथा, न नायकाचं नायकपण आणि सिनेमाच्या संबंधित इतर निर्जीव गोष्टींच्या अफलातून अशा गप्पांचा हा दुसरा भाग!...more1h 11minPlay
May 16, 2023पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त...!सिनेमाची आवड आणि सिनेमा जगणं ह्यात असलेली रेषा मिटवून टाकलेला अमोल उदगीरकर ज्याला फक्त सिनेमा वेडाच म्हणता येईल, त्याच्यासोबत झालेल्या ह्या सिनेगप्पा! सिनेमाचं जग हे आपल्या जगण्यात किती बेमालूम मिसळून गेलं आहे हे अगदी सहजतेने सांगत ९० च्या दशकात असणाऱ्या सिनेमाच्या कितीतरी विषयांवर मारलेल्या रंजक गप्पांचा हा पहिला भाग. ...more1h 19minPlay
April 13, 2023धांडोळा...कुतूहलाचा!कुतूहल ही आपली एक नैसर्गिक भावना. ह्याच कुतूहलापोटी पडणाऱ्या अनेक प्रश्नांचा धांडोळा घेऊन, मिळालेली उत्तरं रंजक पद्धतीने आपल्या ब्लॉगमार्फत मांडणारा यशोधन जोशी. गप्पांगणच्या ह्या भागात ऐका पुरस्कार विजेत्या 'धांडोळा' ह्या ब्लॉगविषयी आणि त्यातल्या तितक्याच अफलातून अशा पोस्टस विषयी यशोधनसोबत मारलेल्या गप्पा!...more40minPlay
April 02, 2023गोष्ट... विज्ञानकथेची !मराठी साहित्यामध्ये विज्ञानकथेचा समृद्ध असा कप्पा आहे. १०० पेक्षा जास्त वर्षांची असलेली हि कथा नेमकी असते तरी कशी? तिची वैशिष्ट्ये काय आहेत? मराठीतले प्रसिद्ध विज्ञानकथा लेखक/लेखिका आणि त्यांच्या कथा ह्यांच्याविषयी सांगत आहेत, सुप्रसिद्ध विज्ञानकथा लेखिका स्मिता पोतनीस. विज्ञानकथेविषयी मारलेल्या गप्पांचा हा भाग.. ...more1h 1minPlay
March 29, 2023खादाडीखाणं भरभरून जगणारा, त्याच्याशी संबंधित असणाऱ्या कित्येक गोष्टींबाबत तितकंच भरभरून बोलणाऱ्या चेतनशी, वेगवेगळे पदार्थांचा उगम, खादाडी ह्या विषयावर मारलेल्या गप्पा. ...more1h 26minPlay
FAQs about गप्पांगण:How many episodes does गप्पांगण have?The podcast currently has 27 episodes available.