Solid Joys

March 11 : दोन अमर्याद सबळ आणि मृदु सत्य


Listen Later

"मी आरंभीच शेवट कळवितो. होणार्‍या गोष्टी घडविण्यापूर्वी त्या मी प्राचीन काळापासून सांगत आलो आहे; माझा संकल्प सिद्धीस जाईल, माझा मनोरथ मी पूर्ण करीन . " ( यशया 46:10 )

"सार्वभौमता" हा शब्द ("ट्रिनिटी"- त्रेकय ह्या शब्दाप्रमाणेच) पवित्र शास्त्रात आढळत नाहीं. आपण त्याचा उपयोग हे सत्य सांगण्यास करतो कीं, देवच ह्या जगाचा सर्वोच्च नियंत्रक आहे, मोठ्यातल्यां मोठ्या आंतरराष्ट्रीय घडामोडी व जंगलातील लहानातील लहान पाखराचे झाडावरून पडणे, ह्या सर्व गोष्टींवर त्याचें सर्वोच्च नियंत्रण आहे.

बायबल हा सिद्धांत अशाप्रकारे मांडतो : ...मीच देव आहे, दुसरा कोणी नव्हे, माझ्यासमान कोणीच नाहीं...... ‘माझा संकल्प सिद्धीस जाईल, माझा मनोरथ मी पूर्ण करीन. (यशया 46:9–10.) आणि : तो (देव) आकाशातील आपल्यां सैन्याचे व पृथ्वीवरील रहिवाशांचे इच्छेस येईल ते करतो; “तू असे काय करतोस?” असे त्याचा हात धरून कोणाच्याने त्याला म्हणवत नाहीं” (दानीएल 4:35). आणि : “तो न बदलणारा आहे, त्याला त्यापासून कोण फिरवणार? आपल्यां मनास येते ते तो करतो; जे मला नेमले आहे ते तो घडवून आणत आहे; अशा पुष्कळ गोष्टी त्याच्याजवळ आहेत” (इयोब  23:13–14). आणि : “आमचा देव स्वर्गात आहे; त्याला योग्य दिसते ते सर्व तो करतो” (स्तोत्र 115:3).

ही शिकवण विश्वासणा-या करीत खूप मौल्यवान असण्याचे एक कारण हे आहे कीं, जे देवावर विश्वास ठेवतात त्यांचावर दया व कृपा करणे हा देवाचा मनोरथ आहे (इफिस 2:7, स्तोत्र 37:3-7, नीति 29:25).  देवाच्या सार्वभौमतेचा अर्थ असा होतो कीं आपल्यांकरिता असलेली त्याची योजना कधीच विफल होत नाहीं ती अपयशी होऊंच शकत नाहीं.

"जे देवावर प्रीति करतात" व " जे त्याच्या संकल्पा प्रमाणे बोलाविलेलें" आहेंत, त्यांच्या बरोबर अशी कोणतीच गोष्ट घडत नाहीं जी सखोलपणे, दीर्घपणे व त्यांच्या सर्वोच्च कल्यांणाकरिता कार्य करीत नाहीं ( रोम 8:28 ; स्तोत्र 84:11 ). 

यासाठींच मी म्हणतो कीं देवाची दया व त्याचें सार्वभौमत्व हे माझ्या जीवनाचे दोन स्तंभ आहेत. ते माझ्या भविष्याची आशा आहेत, माझ्या सेवाकार्याचे बळ आहेत, माझ्या ईश्वरविज्ञानाचा केंद्रबिंदू आहेत, माझ्या विवाहाचा बंध आहेत, माझ्या सर्व रोगांचे औषध आहेत आणि माझ्या सर्व निराशेचा उपाय आहेत.

आणि जेव्हां मी मृत्युच्या पायरीवर येईन ( आता किंवा कालांतराने ) तेव्हां ही दोन सत्य माझ्या मृत्यूशय्येच्या बाजूला उभी असतील आणि अमर्याद बळाने आणि कोमलतेने मला उंचावून देवाकडें नेतील.

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

Solid JoysBy Alethia4India