Solid Joys

March 8 : तुमच्या मनाची कवाडे उघडा


Listen Later

 “चेपलेला बोरू तो मोडणार नाहीं, मिणमिणती वात तो विझविणार नाहीं.” (यशया 42:3)

 बर्‍याच आठवड्यानंतर मनाला उत्तेजन देणारे शब्द माझ्या वाचनात आले, जे यशया 42:1-3 यातून होते, जे येशू त्याच्या आत्मिक शक्तीचा वापर कशाप्रकारे करेल याविषयीं सांगतात. 

तुम्हांला एखाद्या चेपलेल्यां बोरू प्रमाणे वाटते का - ईस्टर लिलीच्या फुलाप्रमाणे, ज्याची फांदी चेपलेली आहे व त्यामुळे काहींच सत्व न मिळाल्यांमुळे ते फूल खाली पडले आहे. तुम्हांला कधी असे वाटते का, कीं तुमचा विश्वास जळत्या ज्वालेमध्यें एका लहान ठिणगी प्रमाणे आहे- वाढदिवसाच्या विझवीलेल्यां मेणबत्तीच्या वातेतील लहानश्या ठिणगी प्रमाणे?

धीर धरा! ख्रिस्ताचा आत्मा हा उत्तेजनाचा आत्मा आहे, तो तुमचे फूल तोडून टाकणार नाहीं, तो तुमच्यातील ठिणगी विझविणार नाहीं.

“परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे, कारण दीनांस सुवार्ता सांगण्यास त्यानें मला अभिषेक केला” (लूक 4:18). “तुमच्यावर न्याय्यत्वाचा सूर्य उदय पावेल, त्याच्या पंखांच्या ठायी आरोग्य असेल” (मलाखी 4:2). “[तो] मनाचा सौम्य व लीन आहे......‘तुमच्या जिवांना विसावा मिळेल” (मत्तय 11:29). “परमेश्वराची प्रतीक्षा कर; खंबीर हो, हिम्मत धर; परमेश्वराचीच प्रतीक्षा कर” (स्तोत्र 27:14).

आपल्यांला दु:ख वाटू शकते कीं, आपण एक मोठी ज्वाला नसून, केवळ एक ठिणगी आहोंत. पण ऐका! आणि उत्तेजन प्राप्त करून घ्या: होय, मोठ्या आगीमध्यें व ठिणगीमध्यें खूप मोठा फरक आहे. पण ठिणगी असण्यामध्यें आणि ठिणगी नसण्यामध्यें देखील खूप मोठा फरक आहे. विश्वासच नसणे या पेक्षा मोहरीच्या दाण्याएवढा विश्वास, हा डोंगरा एवढा विश्वास होण्यापेक्षा जास्त सोयीस्कर आहे.

देवाच्या अभिवचनाची कवाडे उघडा आणि पवित्र आत्म्याला तुमच्या मनाच्या प्रत्येक खोलीमध्यें फुंकर घालू द्या. देवाचा पवित्र आत्मा कधीच मोडणार नाहीं किंवा विझवीणार नाहीं. तो तुमचे मस्तक उंच करील, व तुमच्यातील ठिणगीला वारा देऊन एक ज्वाला बनवेल. तो उत्तेजनाचा आत्मा आहे.

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

Solid JoysBy Alethia4India