
Sign up to save your podcasts
Or


एक जीवघेणा अपघात...त्यानंतर सहा महिन्यांच्या उपचारांच्या काळात ६२ कोटींच्या उलाढालीला बसलेले आर्थिक धक्के...पाठोपाठ आलेल्या कोरोना आणि त्यादरम्यान गुंतवणूकदारांनी काढून घेतलेले अंग...`एनपीए`मध्ये गेलेले अकाउंट आणि खुंटलेले सगळे मार्ग...त्यातून दोन वेळा केलेला आत्महत्येचा प्रयत्न आणि तोही अयशस्वी झाल्यानंतर आता `इतरांना जगवण्यासाठी जगायचे` या निर्धाराने मालकाच्या खुर्चीत साक्षात महालक्षीची प्रतिष्ठापना करुन स्वतःला कामाला वाहून घेणे आणि बाजारात महालक्ष्मी फूड प्रॉडक्टस् ची पूर्वीची पत निर्माण करणे...योगेश माधव सरपोतदार यांची ही वाटचाल रोमहर्षक आहे.
साखर कारखानदारी हा सहकार क्षेत्राशी, पर्यायाने राजकारणाशी संबंधित विषय असा सर्वसाधारण समज असतो. पण खासगी कारखानदारी यशस्वीपणे कार्यरत असते आणि महेश देशमुख यांसारखा अमेरिकेतून उच्चशिक्षण घेऊन परतलेला केमिकल इंजिनिअर कारखान्यांचा व्याप सांभाळू लागतो तेव्हा कारखानदारीच्या जुन्या प्रतिमा ढासळू लागतात. तेथे साखर, इथेनॉल, को-जनरेशनबरोबरच डायमिथाईल इथर, बीओडी-सीओडी रिडक्शन, कार्बन फुटप्रिंट अशा प्रोसेस आणि आयओसीएल, एनसीएलसोबतची कामे दिसायला लागतात...
मेडिकलला नंबर लागू शकत असतानासुद्धा अधिक व्यापक विचार करीत मनन हरेष शहा यांनी आय़सीटी मधून फार्मसी अभ्यासक्रमाचा मार्ग निवडला. आपले वैद्यकीय ज्ञान आणि व्यवस्थापन कौशल्ये यांच्या आधारावर शेकडोंना रोजगार देणारा उद्योग पुढे नेण्याचा त्यांचा निर्णय त्यांच्या वडिलांनी मोठ्या कष्टाने उभारलेल्या फार्मसी उद्योगाला नवी दिशा देणारा ठरला. भारतीय बाजारपेठेत ते प्रभावी आहेतच. पण `ईयू-जीएमपी` प्रमाणीकरणाच्या माध्यमातून जगभरातील १५०+ देशांत निर्यातीचा त्यांचा मार्ग आता निर्वेध झाला आहे.
काश्मीरपासून केरळपर्यंत विविध राज्यांत धावणाऱ्या सरकारी उपक्रमातील प्रवासी बसेस असोत की खासगी लक्झरी बसेस, स्कूलबस असोत की कामगारांची वाहतूक करणाऱ्या.... त्यातील बहुतांश प्रकारच्या वाहनांमध्ये `कायझेन`ने बनविलेली आसने फिट केलेली असतात. एकेकाळी अशा आसनांची केवळ फॅब्रिकेशन करुन देण्याचे काम करणारा हा उद्योग आता संपूर्ण सिटिंग सोल्युशन्स देतो. आता देशभराबरोबर काही आखाती देशांतही तेजस विजय इंगळे यांच्या कंपनीची ही उत्पादने जाऊ लागली आहेत.
`मिसेस परफेक्शनिस्ट ` असं वर्णन करता येईल अशा उद्योजक म्हणजे कश्मिरा संजय जाधव. अभ्यास असो, क्रीडाकौशल्ये असोत, घरातील उद्योगाची परंपरा पुढे चालविणे असो, की उद्योगातील नवनिर्मितीमध्ये आपले योगदान असो, प्रत्येक आघाडीवर कश्मिरा अचूकपणाचा आग्रह धरतात. जे काही करायचे असेल त्याची बेसिक्स स्पष्ट असावीत आणि एण्ड रिझल्ट देखील सुनिश्चित असावा, हा त्यांचा आग्रह. जुन्या-नव्या पिढीचा संगम घडवून आणण्यात, आपल्या उद्योगाला अल्पावधीतच नवी दिशा देण्यात, त्यांना यश आले आहे.
परदेशातील बाजारपेठेत विश्वासार्हता निर्माण करायची तर आपली उत्पादने सर्वोत्तम गुणवत्तेचीच असायला हवीत. मायक्रोफिनिशिंगचे क्षेत्र ऑटोमोटिव्ह उद्योगात अत्यंत संवेदनशील. तेथे तुमच्या यंत्रांची गुणवत्ता क्लायंट ते एन्ड यूजर अशा विविध पातळ्यांवर तपासली जाते. या वेळी गुणवत्तेचा कस लागतो. मोहिनी व मिलिंद केळकर यांनी निर्माण केलेल्या मजबूत पायावर (ग्राइंड मास्टर मशीन्स) समीर केळकर उभारत असलेली भक्कम इमारत उत्तुंगतेचा त्यांचा अमर्याद ध्यास कथन करते.
मायक्रो ब्रेव्हरीज हा परदेशांत रुढ झालेला ट्रेंड भारतात मागील एकदोन दशकांपासून बऱ्यापैकी लोकप्रिय होतो आहे. उत्पादनानुसार अल्कोहलचे ४ ते ८ टक्के असणारे प्रमाण, उपलब्ध असलेले वेगवेगळ्या चवींचे प्रकार आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ताजी व स्थानिक चव ही या उत्पादनाची खास आकर्षणे. वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीतून `फायनान्स`मधील मास्टर्स पूर्ण करणाऱ्या नकुल विवेक भोसले यांनी अत्यंत मेहनतीने विकसित केलेला `ग्रेट स्टेट` हा `क्रॉफ्ट बिअर`चा ब्रॅंड पुणे आणि गोव्यात लोकप्रिय ठरलेला आहे. त्याविषयी...
वीज वितरणात सर्वात महत्त्वाचा भाग असतो तो ट्रान्सफॉर्मरचा. अशा ट्रान्सफॉर्मर बाजारपेठेत दिग्विजय इंडस्ट्रीज (छत्रपती संभाजीनगर)ने आज मोठी विश्वासार्हता कमविली आहे. आपल्या आईवडिलांनी उभारलेल्या या उद्योगात आल्यानंतर, आशुतोष श्रीराम शिंदे यांनी नावीन्याची कास धरत आपल्या उद्योगाला भविष्यवेधी दिशा दाखवली...आणि मग त्यांचा प्रवास `लोकल ते ग्लोबल` असा सुरु झाला. त्यांनी हे कसे साधले?
आधीच्या पिढीने सुरु केेलेला उद्योग नव्या पिढीने आधी १० पट वाढवायचा आणि त्यानंतरचे लक्ष्य १०० पट वाढविण्याचे ठवायचे. विदर्भातील मलकापूरसारख्या ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या परिसरातून रसायनशास्त्र आणि जीवशास्त्राच्या क्षेत्रात कार्यरत असलेला उद्योग विकसित करायचा आणि तो जागतिक पातळीवर विस्तारायचा, हे आव्हान दोन्ही पिढ्यांनी पेलले. आता नव्या पिढीकडून प्रतीक्षा आहे ती आरोग्यविषयक अभिनव उत्पादनांच्या निर्मितीतून वैद्यकनिदान क्षेत्राताल नवी दिशा देण्याचे.
चैतन्य ग्रुप ऑफ कंपनीज (मलकापूर, जि. बुलडाणा)च्या प्रसन्न अशोक देशपांडे यांनी ही किमया कशी साधली..?
शेती आधारित उद्योग उभा करणे हे मोठे आव्हान असते. शेतीलाच उद्योग मानून उत्पादने विकसित करणे हे त्याहून मोठे आव्हान. संजीवके, खते, किटकनाशके, बियाणे यांमधील सखोल ज्ञान, अफाट शेतकरी संपर्क आणि १८ वर्षांचा अनुभव असणारे माना आणि उत्तम जनसंपर्क कौशल्य व मार्केटिंगमध्ये उच्चशिक्षण असलेला भाचा, अशी जोडी उद्योगात उतरल्यानंतर अल्पावधीतच बिझनेसला कोठून कोठे नेऊ शकतात याचे आगळे उदाहरण गजानन जाधव व शंतनू मोगल यांनी बूस्टर प्लॅंट जेनेटिक्स प्रा.लि. (छत्रपती संभाजीनगर) या उद्योगाच्या माध्यमातून दाखवून दिले.
From the publisher's feed