
Sign up to save your podcasts
Or


मूर्ख आणि सूचीमुख पक्षी
नानाम्यं नमतजे दारु नाश्मनि स्यात्क्षुरक्रिया ।
सूचीमुखं विजानीहि नाशिष्यायोपदिश्यते ॥
नानाम्यं नमतजे दारु नाश्मनि स्यात्क्षुरक्रिया ।
सूचीमुखं विजानीहि नाशिष्यायोपदिश्यते ॥
वाकण्या लायक नसलेले लाकूड वाकत नाही, दगडाने दाढी करता येत नाही आणि अशिष्याला उपदेश करता येत नाही... सूचीमुख याचच उदाहरण आहे.
कोण्या एका डोंगराळ भागातल्या एका जंगलात माकडांची टोळी राहत असे. एकदा पावसात भिजून गारठून गेल्याने ते कुडकुडत होते. काहीतरी करून थंडीपासून बचाव करण्यासाठी आगीसारखे दिसणारे कोरडे गवत त्यांनी एकत्र केले आणि फुंकर मारून त्यातून ऊब निर्माण करण्याचा ते प्रयत्न करू लागले.
त्यांना अशा प्रकारे गवताच्या ढीगर्याभोवती बसून निरर्थक प्रयत्न कारताना पाहून सूचीमुख नावाचा एक पक्षी त्यांच्यापाशी येऊन म्हणाला, "हे काय मूर्खासारखं करताय. अशाने आग पेटणार नाही. इथे थंडीने कुडकुडण्यापेक्षा एखाद्या गुहेत जाऊन तिथे बसून स्वतःचा जीव वाचवा.. ढग गडगडतायत आणि आता अजून जोरात पाऊस पडणार आहे.
त्यांच्यातला एक म्हातारं माकड म्हणाला, "तू तुझं काम कर, आम्हाला ज्ञान शिकवायची गरज नाहीये."
पक्ष्याने म्हातार्या माकडाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं आणि तो तीच गोष्ट परतपरत सांगू लागला, "अरे माकडांनो असे फुकट प्रयत्न करू नका."
तो पक्षी अजिबातच ऐकेनासा झाला तेव्हा आपले प्रयत्न वाया गेल्यामुळे संतपून एका माकडाने त्याचे दोन्ही पंख पकडले आणि त्याला एका दगडावर आपटून मारून टाकले.
म्हणूनच म्हणतात ज्याची योग्यताच नाही त्याला शिकवण्याचा प्रयत्न करू नये.
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
सुतार पक्षी, चिमणी, बेडूक तथा मशीसारख्या सामन्यांचा विरोध केल्यामुळे हत्तीसुद्धा नष्ट झाला होता.
एका जंगलात चटक आणि चटकी नावाचं एक चिमण्यांचं जोडपं एका हिरव्यागार तमालवृक्षावर घरटं बांधून रहात होतं. चटकीने एकदा घरट्यात अंडी घातली. एके दिवशी एक मस्तवाल हत्ती कडक उन्ह टाळण्यासाठी त्या झाडाखाली आला. आपल्या शक्तीच्या मस्तीत त्याने ज्या फांदीवर चिमण्यांचं घरटं होतं तिचं फांदी आपल्या सोंडेत धरून तोडून टाकली.
फांदी तुटल्यामुळे घरटं खाली पडलं आणि त्यातली सगळी अंडी फुटली. साहजिकच चटकी रडू लागली. तिचं रडणं ऐकून तिचा मित्र सुतार पक्षी म्हणाला “कशाला रडतेस? जे गेलं त्यासाठी रडू नये. आपल्याला आपल्या ताकदीला साजेसं जीवन जगायचं असतं!”
हे ऐकून चटक म्हणाला “तुझं म्हणणं बरोबर आहे. पण शक्तीच्या मस्तीत त्या हत्तीने जो गुन्हा केला त्याची शिक्षा त्याला नक्कीच मिळायला हवी. तू माझा खरा मित्र असशील तर मला त्याला शिक्षा द्यायचा मार्ग सुचव. मगच आमची पिल्लं गमावल्याचं दुःख कमी होईल!”
सुतार पक्षी त्याच्या मैत्रिणीकडे, म्हणजेच वीणारवा नावाच्या माशीकडे गेला. तिला त्याने सर्व हकीकत सांगितली. माशी त्याला घेऊन मेघनादकडे, म्हणजेच तिच्या एका बेडूक मित्राकडे गेली. सगळ्यांनी चर्चा करून हत्तीला धडा शिकवायची एक युक्ती ठरवली.
मेघनाद माशीला म्हणाला “वीणारवी ! उद्या दुपारी तू हत्तीच्या कानात जाऊन तुझी गोड गुणगुण कर. त्यात गुंग होऊन तो आपले डोळे मिटून घेईल. आणि त्याच क्षणी सुतारपक्षी आपल्या टोकदार चोचेने त्याचे डोळे फोडून टाकेल. आंधळा झाल्यावर तो जेंव्हा पिण्यासाठी पाणी शोधेल, तेंव्हा मी एका खोल दरीजवळ जाऊन जोरजोरात ओरडेन. माझ्या आवाजाने तो जवळ पाणी आहे असे समजून तिथे येईल, आणि दरीत पडून मरून जाईल.
अशा प्रकारे सगळ्यांनी मिळून एका भल्यामोठ्या हत्तीलाही आपल्या चातुर्याने मारून टाकलं.
म्हणूनच म्हणतात की अंगात शक्ती कमी असली तरी बुद्धीचा वापर करून बलवान शत्रूचा पराभव करता येतो
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
संकट येण्याआधीच सावधपणे त्यापासून बचाव करण्याची तयारी करणारा आणि संकट येताच सिद्ध राहून त्याच्यावर मात करू शकणारा...या दोघांना सूख मिळतं आणि त्यांचा विकास होतो. जे नशिबात असेल तेच होईल असा विचार करणारे दैववादी नष्ट होतात.
एका तलावात विधाता, सिद्ध आणि दैववादी अशा नावांचे तीन मासे रहात होते. एके दिवशी काही कोळ्यांनी तो तलाव पाहिला, आणि त्यात खूप मासे आहेत हे पाहुन ते म्हणाले “उद्या आपण इथे मासेमारीसाठी येऊ!” हे ऐकून विधाताने सगळ्या माशांना बोलावलं आणि म्हणाला “त्या कोळ्यांचं बोलणं ऐकलंत? जिवंत राहायचं असेल तर आज रात्रीच आपल्याला जवळच्या दुसऱ्या तलावात जावं लागेल!’
विधाताचं म्हणणं ऐकून इतर मासे म्हणाले “आपलं घर सोडून आम्ही इतर कुठे नव्या जागेत जाऊ शकत नाही!”
यावर सिद्ध म्हणाला “नव्या जागेत काही नव्याच अडचणी येऊ शकतात. आपण इथेच राहून कोळ्यांना प्रतिकार करायचा प्रयत्न करायला हवा!”
दैववादी म्हणाला “जे नशिबात असेल ते होणारच. उगाच काहीही प्रयत्न करण्यात अर्थ नाही!”
विधाता त्याच्या कुटुंबाला घेऊन रात्रीच दुसऱ्या तलावात गेला.
दुसऱ्या दिवशी कोळ्यांनी जाळं टाकलं. त्यात सिद्ध आणि दैववादीसह इतर मासे अडकले.
सिद्धाने जाळ्यात अडकताक्षणीच मेल्याचं सोंग घेतलं. साहजिकच कोळ्यांनी मेलेला मासा म्हणून त्याला पुन्हा पाण्यात फेकून दिलं. दैववादी आणि इतर माशांना मात्र ते घेऊन गेले.
म्हणूनच म्हणतात की संकट यायच्या आधीच तयार राहणारे, आणि संकट आल्यावर त्यातून सुटकेचा मार्ग शोधणारे सुरक्षित राहतात. सर्वकाही नशिबावर सोडून देणारे मात्र नष्ट होतात.
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
सुहृदां हितकामानां न करोतीह यो वचः ।
स कूर्म इव दुर्बुद्धिः काष्ठाभ्द्रष्टों विनश्यति ॥
“जो आपल्या सहृदय हितचिंतकांचा सल्ला ऐकत नाही, तो स्वतःच्या मूर्खपणामुळे खाली पडणाऱ्या त्या कासवासारखा नष्ट होतो”
एका तलावात कम्बुग्रीव नावाचं एक कासव रहात होतं. संकट आणि विकट अशा नावाचे दोन हंस त्याचे खास मित्र होते. खूप वर्षांत पाउस न पडल्यामुळे एकदा तो तलाव हळूहळू सुकायला लागला. एके दिवशी याच विषयावर हे तिघे बोलत होते. कासव म्हणालं “मित्रांनो! पाण्याशिवाय आपलं जगणं अशक्य आहे. जीव वाचवण्यासाठी आपल्याला काहीतरी मार्ग शोधायला हवा!”
हंस म्हणाले “इथून थोड्याच अंतरावर एक मोठा तलाव आहे. त्यात पुष्कळ पाणी आहे. आपल्याला तिथेच जायला हवं!”
यावर कासव म्हणालं “तुम्ही दोघं जाऊन कुठून तरी एक लाकडाची काठी घेऊन या. ती काठी तुम्ही दोन्ही बाजूंनी तुमच्या पंजांमध्ये धरून उडायचं. आणि मी ती काठी दातांनी धरून तिला लटकेन!”
त्यावर हंस म्हणाले “चालेल, आम्ही तू म्हणतोस तसं करू. पण तू कुठल्याही परीस्थितीत तोंड उघडू नको. तोंड उघडलंस तर तू खाली पडून मरशील!”
ठरल्याप्रमाणे दोन्ही हंस कासवाने दातांनी धरलेली काठी घेऊन उडत निघाले. रस्त्यात त्यांना एक गाव लागलं. हा प्रकार बघून गावकरी चकित झाले आणि म्हणू लागले “अरेच्या! बघा बघा हे पक्षी चक्रासारखं काहीतरी घेऊन उडत चाललेत!”
हे ऐकून कासवाला राहवलं नाही आणि ते म्हणालं “चक्रासारखं काहीतरी नाही, हा मी आहे, कम्बुग्रीव!”
हे बोलताना साहजिकच कासवाचं तोंड उघडलं आणि इतक्या उंचावरून खाली पडल्यामुळे ते मेलं.
म्हणूनच असं म्हणतात की आपल्या हितचिंतकांचा सल्ला ऐकावा.
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
एका समुद्रकिनाऱ्यावर टिटवी पक्ष्यांचं एक जोडपं रहात होतं. त्यातल्या मादीची अंडी घालायची वेळ जवळ आली होती. तिने नराला लवकरात लवकर एखादं शांत ठिकाण शोधायला सांगितलं, जिथे ती अंडी घालू शकेल. नर म्हणाला “हा समुद्रकिनारा किती सुंदर आहे, तू इथेच अंडी घाल!” त्यावर मादी म्हणाली “पौर्णिमेच्या दिवशी इथे इतकी मोठी भरती येते की त्यात मोठमोठे हत्तीही वाहून जातात. त्यामुळे तू लवकरात लवकर एखादं दुसरं ठिकाण शोध. नर म्हणाला “तुझं म्हणणं तर बरोबर आहे. पण या समुद्राची काय बिशाद आहे की तो माझ्या मुलांचं काही वाकडं करू शकेल. तू निर्धास्तपणे इथेच अंडी घाल!”
तिकडे समुद्राने त्या दोघांचं बोलणं ऐकलं, आणि मनातल्या मनात म्हणाला “किती पोकळ गर्व आहे या पक्ष्यांमध्ये. रात्री तर असे पाय वर करून झोपतात, की जणू काही आकाशच उचलून धरताहेत. बघूया तरी यांची ताकद!” असं म्हणून समुद्र शांत झाला, आणि टिटवीने किनाऱ्यावर अंडी घातली. दुसऱ्याच दिवशी जेंव्हा हे जोडपं अन्न शोधायला गेलं, तेंव्हा समुद्राला भरती आली. साहजिकच टिटव्यांची अंडी वाहून गेली. ते परत आल्यावर जेंव्हा अंडी जागेवर दिसली नाहीत तेंव्हा मादी संतापाने नराला म्हणाली “अरे मूर्खा! मी तुला म्हटलं होतं की समुद्राच्या भरतीत माझी अंडी वाहून जातील. म्हणून तुला दुसरं ठिकाणही शोधायला सांगितलं होतं. पण तू तुझ्या मूर्खपणामुळे आणि गर्विष्ठपणामुळे माझं ऐकलं नाहीस!”
नर म्हणाला “लाडके, तू काळजी करू नको. मी या समुद्राला सुकवून आपली अंडी परत आणेन!” मग नराने सारस, बदक, मोर इत्यादी मित्रांना बोलावून सांगितलं “मित्रांनो! हा समुद्र आमची अंडी घेऊन गेलाय. याला सुकवून आमची अंडी परत आणण्यासाठी तुम्ही मला मदत करा!”
हे ऐकून त्या पक्ष्यांनी आपापसात चर्चा केली आणि म्हणाले “समुद्र सुकवायची ताकद आमच्यात नाही. मग उगाच श्रम घेण्यात काय अर्थ आहे? गरुडदेव आपले राजे आहेत. आपण सगळेजण जाऊन त्यांना हे सांगूया. ते नक्कीच आपल्याला मदत करतील!”
असा निर्णय घेऊन सगळे पक्षी रडत रडत गरुडदेवांकडे गेले आणि म्हणाले “महाराज! घात झालाय. काहीही कारण नसताना या बिचाऱ्या टिटव्यांची अंडी समुद्राने नेलीत. तुमच्यासारखा शक्तिशाली राजा असताना समुद्राची अशी हिम्मतच कशी झाली!
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
कोण्या एका जंगलात मदोत्कट नावाचा एक सिंह राहात होता. गेंडा, कावळा आणि गिधाड त्याचे सेवक होते. एक दिवस त्यांना जगला इकडेतिकडे फिरणारा आपल्या तांड्यापासून भरकटलेला क्रथनक नावाचा एक उंट दिसला. उंटाला पाहून सिंह म्हणाला, "वा! हा तर खूपच सुंदर प्राणी आहे. माहिती काढा हा पाळीव आहे की जंगली." हे ऐकल्यावर कावळा म्हणाला, "स्वामी उंट नावाचा हा पाळीव प्राणी तुमचं भोजन आहे. तुम्ही लगेच त्याला ठार मारा." सिंह म्हणाला, "नाही. मी माझ्या घरी आलेल्याला नाही मारणारा. तुम्ही त्याला अभयदान द्या आणि माझ्याकडे घेऊन या. जेणेकरून मी त्याला इथे येण्याचं कारण विचारू शकेन."
सिंहाचं म्हणणं मान्य करून त्याच्या साथीदारांनी उंटाला कसंबसं विश्वासात घेतलं आणि ते त्याला मदोत्कटाकडे घेऊन आले. तेव्हा सिंहाने विचारल्यावर त्या उंटाने स्वतःविषयी सार काही सांगून टाकलं की कशा प्रकारे गावात तो आपल्या मालकासाठी ओझी उचलायचा आणि आज कशा प्रकारे आज त्याची आणि त्याच्या साथीदारांची चुकामुक होऊन तो इथे जंगलात पोचला, हे सगळं त्याने सांगितलं. त्याचं बोलणं ऐकून सिंह म्हणाला, "क्रथनक भाऊ, आता तुम्हाला गावी परत जाऊन पुन्हा ओझी उचलण्याचं काहीच कारण नाही. तुम्ही आता इथेच आमच्याबरोबर या जंगलात रहा आणि अजिबात न घाबरता हिरव्या लुसलुशीत गवताचा आनंद घ्या.
तेव्हापासून मदोत्कटाच्या संरक्षणात तो हत्ती एकदम निडर होऊन जंगलात राहू लागला
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
कोण्या एका जंगलात चंडरव नावाचा एक कोल्हा राहात हवा. तो एकदा भुकेने व्याकूळ होऊन अन्नाच्या शोधात एका नगरात जाऊन पोचला. नगरातले कुत्रे त्याला पाहून भुंकत भुंकत त्याच्या मागे धावू लागले. त्यांच्यापासून आपला जीव वाचवण्यासाठी तो कोल्हा धावत धावत एका धोब्याच्या घरात घुसला. तिथे निळीच्या पाण्याने भरलेला हौद होता. घाबरलेला कुत्रा गडबडीत त्या हौदात पडला. जेव्हा तो हौदातून बाहेर आला तेव्हा त्याचा रंग निळा झाल्यामुळे कुत्रे त्याला ओळखू शकले नाहीत आणि त्यांनी त्याची पाठ सोडली. निळ्या रंगात रंगलेला कोल्हा हळूहळू जंगलात पोचला.
जंगलातले सगळे प्राणी रंगीत कोल्हा पाहून आश्चर्यचकित झाले आणि घाबरून इकडे तिकडे पळू लागले. इतकंच तर मोठमोठे हत्ती आणि भयानक सिंहदेखील या नव्या प्राण्यामुळे घाबरून गेले. त्यांना घाबरून गेलेलं पाहून चंडरव म्हणाला, "हे जंगली प्राण्यांनो तुम्ही मला बघून का पळून जाताय? मला घाबरू नका. ब्रह्मदेवांनी आजच माझी निर्मिती केली आहे आणि मला जंगलातल्या सर्व प्राण्यांचा राजा बनवून इथे पाठवले आहे. माझं नाव ककुद्द्रुम आहे, आणि साक्षात ब्रह्मदेवाच्या आज्ञेनुसार मी तुम्हा सर्वांचा राजा आहे.
त्याचं बोलणं ऐकून सर्व प्राणी म्हणाले, "आज्ञा द्या महाराज!"
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
एका राजाच्या राजमहालातील एका मनोहर शयनगृहातल्या स्वच्छ कपड्यात एक सफेद ऊ होती. ती राजा झोपी गेल्यानंतर त्यांचं रक्त पिऊन मोठ्या आनंदाने राहात असे. एके दिवशी फिरत फिरत एक ढेकूण तिथे आला. ढेकणाला पलंगावर पाहून ऊ म्हणाली, "तू इथे कसा आलास? तुझ्याविषयी कोणाला काही कळण्याआधी तू जा बरं इथून निघून." त्यावर ढेकूण म्हणला, "अरे! घरी आलेल्या दुष्टाबरोबरही कोणी असं बोलत नाही. मी माझ्या आयुष्यात ना ना प्रकारच्या माणसांचं रक्त प्यायलोय पण अजून एखाद्या राजाचं गोड रक्त प्यायचं भाग्य काही मला लाभलं नाही. घरी आलेल्याला भुकेल्याला भोजनापासून लांब ठेवून असं एकट्यानेच राजाचं स्वादिष्ट रक्त पिणं तुला शोभत नाही.
ढेकणाचं बोलणं ऐकून ऊ म्हणाली. "मी राजा झोपला की त्याचं रक्त पिते. पण तू आहेस वळवळ्या. जर तुला माझ्याबरोबर राजाचं रक्त प्यायचं असेल तर जरा थांब. आणि माझं पिऊन झालं की तू पण मनसोक्त रक्त पिऊन तृप्त हो.
त्यावर ढेकूण म्हणला, "चालेल मी असंच करतो. जो पर्यंत तू राजाचं रक्त पित नाहीस तो पर्यंत मीही नाही पिणार."
अशा प्रकारे ते दोघं एकमेकांशी बोलत होते तेवढ्यात राजा तिथे येऊन पलंगावर झोपला. तेवढ्यात ढेकणाच्या तोंडाला सुटलं पाणी. तो लागलीच राजाला चावला.
राजा कळवळून पलंगावरून उठून उभा राहिला आणि आपल्या सेवकांना म्हणला, "बघा रे या चादरीत कुठे ढेकूण किंवा ऊ तर नाहीये नां. जी मला आताच चावली.
राजाने असं म्हटल्यावर सेवक बारीक नजरेने चादर पाहू लागले. ढेकूण पटकन पलंगात शिरून लपून बसला. मात्र चादरीवरच्या वळ्यांमध्ये बसलेली ऊ सेवकांच्या दृष्टीला पडली आणि त्यांनी तिला मारून टाकलं.
म्हणूनच म्हणतात, ज्याचा स्वभाव आपल्याला माहीत नाही. त्याला आश्रय देऊ नये.
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
कोण्याएका जंगलात भासुरक नावाचा एक सिंह राहात होता. तो ताकदवान असल्यामुळे रोज अनेक हरणं, ससे अशी जनावरं मारूनही तो शांत होत नसे. एके दिवशी जंगलातले सगळे पशू त्याच्या जवळ गेले आणि त्याला म्हणाले, "महाराज, या सगळ्या प्राण्यांना मारून काय फायदा? एका हरणानेही तुमची भूक भागेल. म्हणून तुम्ही आमच्याशी तह करा. आज पासून घरी बसल्याबसल्या तुमच्या भोजनाची सोय म्हणून रोज एक प्राणी पोच होईल. असं केल्यामुळे तुमची उपजीविका पण चालेल आणि आमचाही नाश नाही होणार."
त्यांचं बोलणं ऐकून भासूरक म्हणाला, "हे तुम्ही अगदी योग्य सुचवलंत पण याद राखा, जर एखाद्या दिवशी माझ्या भोजनासाठी प्राणी इथे पोचला नाही तर मी तुम्हा सगळ्यांना खाऊन टाकेन. सगळे प्राणी म्हणाले, "तुमच्या मनाप्रमाणेच सगळं होईल." इतकं बोलून त्यांनी निरोप घेतला आणि ते प्राणी निर्भयपणे जंगलात राहू लागले. रोज दुपारी एक जीव सिंहाकडे पोचत होता.
एके दिवशी सिंहाकडे जाण्याची पाळी सशाची होती. ससा मरणाच्या भयाने घाबरून हळूहळू चालत होता. चालताचालता तो सिंहाला ठार करून आपला जीव कशाप्रकारे वाचवता येईल त्याचा विचार करत होता. वाटेत त्याला एक विहीर लागली. त्याने त्यात वाकून पाहिलं तर त्याला विहिरीत आपलं प्रतिबिंब दिसलं. ते पाहून सशाला सिंहापासून सुटकेचा मार्ग सापडला.
ससा हळूहळू चालत संध्याकाळी सिंहाकडे पोचला. भासूरक भुकेने व्याकुळ झाला होता आणि या छोट्याशा सशाला पाहून तो अधिक संतापला. तो सशावर गरजला, "अरे नीच... एक तर इतका छोटा आहेस आणि याला एवढा उशीर लावलास! याअपराधाची शिक्षा म्हणून आता तुला खाल्यावर सकाळी मी सगळ्या हरणांना खाऊन टाकणार.
ससा अगदी दबक्या आवाजात म्हणाला, "महाराज, यात नं माझी चूक आहे नं इतर जनावरांची"
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
कोण्या एका जंगलात अनेक जलचरांनी भरलेला एक तलाव होता. तिथे राहणारा एक बगळा म्हातारा झाल्यामुळे त्याला आजकाल मासे पकडता येत नसत. भुकेने व्याकूळ झाल्यामुळे तो नदीकाठी बसून आसवं गाळत रडत बसला होता. त्याच वेळी त्याला एका खेकड्याने रडताना पाहिलं आणि कुतूहल आणि सहानभूती पोटी विचारलं, "मामा! आज तुम्ही तुमच्या भोजनाचा शोध घेण्याचं सोडून इथे रडत का बसला आहात?"
बगळा म्हणाला, "खरंय तुझं. मासे खाऊन मला आता वैराग्य आलं आहे. आता मी आमरण उपोषण सुरू केलं आहे."
खेकड्याने विचारलं, "काय हो मामा पण तुमच्या या वैराग्याचं नेमकं कारण काय?"
बगळा म्हणाला, " अरे याच तळ्यातला माझा जन्म आणि इथेच मी म्हातारा झालो. पण आजच मी ऐकलंय की पुढच्या बारा वर्षात पाऊसच पडणार नाहीये. त्यामुळे आता हा तलाव आटून जाईल आणि इथे राहणार्या सर्व प्राण्यांवर मृत्यूचे संकट ओढवणार आहे. म्हणूनच मी दुःखी आहे."
खेकड्याने सगळ्या जलचरांना ही बातमी सांगितली. भीतीने घाबरगुंडी उडलेले ते सगळे बगळ्यापाशी आले आणि एका स्वरात म्हणाले, "मामा आमचा जीव वाचवण्याचा काही उपाय आहे का?" बगळा म्हणला, "या तलावापासून काही अंतरावर एक खूप मोठा तलाव आहे. त्यात इतकं पाणी आहे, की बारा वर्षच काय चौवीस वर्ष जरी पाऊस पडला नाही तरी त्यातलं पाणी अटणार नाही. जर तुमची इच्छा असेल तर एकेक करून मी तुम्हा सगळ्यांना त्या तलावात नेऊन सोडेन."
अशा प्रकारे बगळा रोज काही मासे तलावातून घेऊन जात असे आणि त्यांना एका खडकावर नेऊन फस्त करत असे. असं अनेक दिवस चाललं आणि धूर्त बगळ्याला विना कष्ट भरपेट भोजन मिळत राहिलं.
एके दिवशी न राहून खेकडा बगळ्याला म्हणाला, "मामा तुमच्याशी सगळ्यात पहिल्यांदा तर मी बोललो होतो आणि अजून पर्यंत तुम्ही मलाच त्या तळ्यात सोडलं नाही. तुम्ही कृपा करून माझ्याही प्राणांचं रक्षण करा."
दुष्ट बगळ्याने विचार केला, "रोज रोज मासे खाऊन मलाही आता कंटाळा आलाय. आज या खेकड्यालाच खाऊन टाकतो. असा मनात विचार करून त्याने त्या खेकड्याला आपल्या पाठीवर बसवलं आणि खडकाच्या दिशेने तो उडू लागला.
खेकड्याला दूरवरून माशांच्या हाडाचा ढीग दिसला. तो पाहून तो घाबरला आणि बगळ्याला म्हणाला, "मामा तो दूसरा तलाव किती लांब आहे? मला एवढावेळ तुमच्या पाठीवर बसवून तुम्ही आता दमला असाल नं!"
बगळ्याने विचार केला, "पाण्यात राहणारा हा खेकडा हा माझं काय वाकडं करणार!" आणि म्हणाला, "अरे खेकड्या दूसरा तलाव वगैरे काही नाहीये. इथे मी माझ्या भोजनाची सोय लावून घेतली आहे आणि आजचं माझं भोजन आहेस तू!"
बगळ्याचं हे बोलणं ऐकताक्षणी खेकड्याने आपल्या नांग्यामध्ये त्याची मान आवळली आणि त्यामुळे तो दुष्ट बगळा मरण पावला.
बगळा मेल्यावर खेकडा हळूहळू तलावापाशी आला आणि इतरांना त्याने त्या धूर्त बगळयाच्या कावेबाजपणाविषयी सांगून टाकलं.
म्हणूनच म्हणतात, कधीही चंचलवृतीने गरजे पेक्षा अधिक बडबड करू नये.
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
From the publisher's feed