प्रतीकात्मक शिल्पाकृतींचा लक्षणीय आविष्कार ठरलेलं मुंबईतील 'चार्जिंग बुल' - शिल्प साकार
आधुनिक काळात भारतात उद्योगसमूहाचा औद्योगिक परिसर, व्यापारी प्रतिष्ठानांचं आवार वा इमारत व त्याचप्रमाणे शैक्षणिक संस्थांचं संकुल आदी ठिकाणी प्रतीकात्मक आशय व्यक्त करणाऱ्या शिल्पाकृती उभारण्याची परंपरा विकसित होत गेली. या प्रकारच्या प्रतीकात्मक शैलीतील मुंबईच्या 'बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज'च्या इमारतीसमोरचं शिल्पकार भगवान रामपुरे यांनी घडवलेलं 'चार्जिंग बुल' वृषभ शिल्प २००८ मध्ये पूर्णत्वाने साकार झालं व याच वर्षी त्याची स्थापना झाली.
केलेला होता. मुंबईचे शिल्पकार एन.जी. पानसरे यांनी 'बॉम्बे म्युच्युअल बिल्डिंग' आणि दन्द् इंडिया अॅश्युअरन्स बिल्डिंग' या मुंबईतील इमारतींवरची जी उत्थित शिल्पं केली, ती या प्रकारात मोडतात.
१९६० च्या दशकात रामकिंकर यांनी •दिल्लीच्या रिझर्व्ह बँकेसमोरचं शिल्प घडवलं, 'कुबेर आणि कुबेरानी' चं हे दगडी शिल्प म्हणजे संपत्तीचा प्रतीकात्मक आविष्कार म्हणूनच साकार केलेलं होतं. १९६० साली सर जे. जे. उपयोजित कलासंस्थेच्या रौप्यमहोत्सवाच्या निमित्ताने जे. जे.च्या आवारात एक शिल्प उभारण्यात आलं. खांद्यावर मृत्तिकापात्र घेतलेली एक स्त्री आणि तिच्या पायाशी असलेलं यंत्राचं चाक अशी ही आधुनिक शैलीत घडवलेली प्रतिमा आहे. पारंपरिक शिल्पकला आणि नवं तंत्रज्ञान यांचा संगम साधून साकार केलेलं हे शिल्प एन. जी. पानसरे आणि एल. आर. आजगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली साकार केलं गेलं.
१९८० च्या दशकापासून 'कॉर्पोरेट' संस्कृतीचा वेगाने विकास होऊ लागला व शहरांचा चेहरामोहराही बदलू लागला. या पार्श्वभूमीवर प्रतीकात्मक शिल्पाकृती म्हणजे या नवसंस्कृतीचा जणू अविभाज्य भाग झाल्याचं चित्र दिसून येतं.
लंडनच्या 'वॉल स्ट्रीट'वरील 'चार्जिंग बुल'च्या धर्तीवर साकारलेलं वृषभ शिल्प मुंबईच्या समृद्धीचं लक्षण ठरलेल्या 'बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज'च्या वास्तूला अनुरूप ठरलं व त्यातून येथील सत्ता व संपत्तीचं सूचन प्रतीकात्मक सर्जनशीलतेने साधलं गेलं. शिल्पाकृती बैलाचा आक्रमक पवित्रा आणि त्याच्या शरीरावरचे तटतटलेले स्नायू यांद्वारे विशेष नाट्यात्मकता साधली गेली.
इमारतींच्या सुशोभीकरणाचा एक भाग (आर्ट डेको) म्हणून शिल्पकलेचा अंतर्भाव करण्याची परंपरा ब्रिटिशांनी इथे आणली. मुंबई विद्यापीठ, क्रॉफर्ड मार्केट अशा इमारतींमध्ये शिल्पकलेचा उपयोग