चिंतामणी गणेश कर्वे : यांचे शिक्षण पुण्यात झाले. शिक्षण पूर्ण झाल्यावर ज्ञानकोशकार केतकरांचे साहाय्य्क म्हणून त्यांनी काम केले. तसेच केतकरांच्या महाराष्ट्रीय ज्ञानकोशाच्या कार्यात त्यानी प्रचंड मदत केली. १९२८ च्या सुमारास त्यांनी महाराष्ट्रीय कोश मंडळाची स्थापना केली. सुलभ विश्वकोशाच्या रचनेतही त्यांचा सहभाग होता. याशिवाय महाराष्ट्रीय शब्दकोश, महाराष्ट्र वाक्यसंप्रदाय कोश, शास्त्रीय परिभाषा कोष अशा अनेक कोशांच्या रचनेत म्हणून त्यांनी कार्य केले.