गप्पांगण

सायकलिंगच्या मार्गावरून जाणारा फिटनेस..निरंजन वेलणकर सोबत!


Listen Later

तुम्ही फिट आहात असं तुम्हाला वाटतं का? असेल तर निरंजन सोबतच्या ह्या गप्पा एकदा नक्की ऐका. कुठलीही आधुनिक सायकल न वापरता जवळपास १५०० किमी चा प्रवास करत कधी मानसिक आरोग्य, कधी एच आय व्ही तर कधी आरोग्य अशा विषयांवर लोकांशी संवाद साधत लदाख पासून ते हैदराबाद पर्यंत प्रवास केलेला निरंजन आपल्या फिटनेसच्या व्याख्या बदलून टाकतो. सायकलिंग हे किती रोमांचक असू शकतं हे अगदी सहजपणे सांगत ते कोणीही करू शकतं हे अत्यंत सोप्या पद्धतीने गप्पांगणच्या ह्या भागात ऐकता येईल. त्याचा हा प्रवास त्याने तितक्याच छान पद्धतीने त्याच्या ब्लॉगवर सुद्धा लिहिला आहे. तुम्ही तो www.niranjan-vichar.blogspot.com इथे वाचू शकता. हा भाग कसा वाटला हे जरूर कळवा.   

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

गप्पांगणBy अमोल कुलकर्णी