आज आपण चर्चा करणार आहोत, मिरेवाडी, ता. फलटण, जि. सातारा येथील तरुण अभ्यासू शेतकरी श्री अजित कोरडे यांचे सोबत.
फ्रुटवाला बागायतदा, आणि फेसबुक युट्युबवर दादा कायम शेतकरी हितासाठी तांत्रिक माहीती कशी उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न करत असतात.
टोमॅटो व्हायरस बाबत टास्क फोर्स मधे देखील त्यांचा सक्रिय सहभाग आहे.
उस शेती ज्या ठिकाणी एक प्रमुख पिक, अशा भागात टोमॅटो पिकाची शेती करत असतांना, टोमॅटो लागवडीतील अन्नद्रव्य व्यवस्थापन, रोग व किड नियंत्रण या सोबतच टोमॅटो मार्केट चा सखोल अभ्यास करतात.
त्यांच्या कडून जाणून घेवुया, शाश्वत शेती व्यवस्थापनासाठी ते जे अनेक प्रयोग करत असतात त्यातील एक मिश्र शेती बाबत...