केतकरांचा पुढचा महिना
मोठा बैचैनीत गेला. रात्र रात्र त्यांचा डोळ्याला डोळा लागत नव्हता. पैशाचा सतत ओघ
त्यांच्याकडे येत होता आणि त्यांची ट्रंक हळूहळू भरत चालली होती. त्यांचा स्वभाव
सुद्धा जास्त जास्त तिरसट, हेकट होऊ लागला होता. चाळीतल्या मुलांमध्ये इतके दिवस
सर्वांना आवडणारे केतकर काका इतके तुसडेपणाने आपल्याशी का वागू लागले आहेत हे
मुलांना कळत नव्हते.