अलिकडच्या काळात डिजिटल घड्याळे ही एक अत्यंत सामान्य रोजच्या व्यवहारातील
गोष्ट झालेली आहे. डिजिटल किंवा ज्यात वेळ आकड्यांत दर्शविला जातो अशी घड्याळे फोन, टीव्ही यापासून ते
हातावरच्या घड्याळापर्यंत उपलब्ध आहेत. पण पन्नास वर्षांपूर्वी भारतात या
प्रकारच्या घड्याळांची कल्पना सुद्धा फारशी कोणाला नव्हती. परदेशात सुद्धा हे असले
डिजिटल डिस्प्ले त्यावेळी नुकतेच दिसू लागले होते. या काळात मी असे एक डिजिटल
घड्याळ विकसित करण्यात कसा यशस्वी झालो होतो त्याची ही हकिगत आहे. मला खात्री आहे