शिकू या NEET- TNE LATUR

TNE -The NEET Educast, Bernard Shaw and Mendel


Listen Later

महाराष्ट्र आणि जॉर्ज बर्नाड शॉ यांचा परस्परसंदर्भ, मराठी रंगभूमी-सोबत जोडला गेलेला आहे. पु.ल. देशपांडे यांच्या बहुपेडी व्यक्तित्वाचं आणखी एक अंग होतं. ते म्हणजे देशाटन. पश्चिमेकडील देशांची सफर पु.ल. देशपांडेंच्या, दोन प्रवास-वर्णनातून आपण अनुभवू शकतो. अपूर्वाई आणि पूर्वरंग.पुलंनी ब्रिटिश आणि इतर युरोपिअन देशातील - समृद्ध नेपथ्यरचना, तंत्रकौशल्याचा पैलू, उत्कृष्ट नाट्यसंहिता यावर देखील त्यांचं चिंतन मांडलं. विशेषतः जॉर्ज बर्नाड शॉ, या जन्माने आयरिश परंतु नंतर ब्रिटन मध्ये स्थायिक झालेल्या -नाटककाराच्या Pygmalion नाटकाचं मराठी परिवेशात रूपांतर केलं. ती फुलराणी, या नाटकाचे मराठी रंगभूमीवर नंतर अनेक प्रयोग झाले. हॉलिवूड मधला My Fair Lady हा चित्रपट देखील यावरच आधारलेला आहे. बर्नार्ड शॉ एक साधे आणि चिंतनशील नाटककर होते. लौकिकार्थाने फार शिक्षण ना झालेल्या या प्रतिभासंपन्न माणसानं, तब्बल सव्वीस नाटकं लिहिली. त्यापैकी एक होतं The Devil 's Disciple. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात झालेल्या अमेरिकन क्रांतीयुद्धातील काही प्रसंगाचा त्या नाटकात समावेश आहे. इतिहास हा नेहमीच वस्तुनिष्ठ नसतो. हे जॉर्ज बर्नाड शॉ यांनी या नाटकात, उपहासपूर्ण पद्धतीनं सांगितलं आहे. भारतीय समाज-माध्यमांवर - हल्ली इतिहासाच्या पुनर्मांडणीचा विषय, मोठ्या धुमधडाक्यात चर्चेत आहे. विशेषतः क्रमिक पाठ्यपुस्तकांच्या परिप्रेक्ष्यात, ही पुनर्मांडणी झाली पाहिजे. असा अनेकांचा आग्रह आहे. बर्नाड शॉ च्या, "इतिहासावरच्या भाष्याची" त्यानिमित्ताने आठवण होते.बर्नाड शॉ च्या जीवनातील एका किश्यावर आधारित एक प्रश्न, बहुतेक AFMC च्या जुन्या परीक्षेत विचारला गेला होता. मेंडेलच्या Law of independent assortment वर आधारित असलेल्या,त्या प्रश्नातील पैलू ला इथं मांडण्याचा माझा प्रयत्न आहे.


(George Bernard Shaw , Mendel, Mendel's laws, Genetics, Marathi Podcasts, Marathi Science Podcasts, NEET Podcasts, NEET Educast)

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

शिकू या NEET- TNE LATURBy sbtledu