By Dattaprasad Joshi
सद्गुरु प्रभू नित भज रे मन तू भज रे
तो अज्ञ जीवांसी ईशरूप पाहे रे।
सद्गुरु प्रभू नित भज रे मन तू भज रे
तो द्वारी आल्या चरणी ठाव देई रे।
सद्गुरु प्रभू नित भज रे मन तू भज रे
तो चरणी आल्या प्रेमे हृदयी धरी रे।
सद्गुरु प्रभू नित भज रे मन तू भज रे
तो प्रेमे सत्य ईश्वरा दावी रे।
सद्गुरु प्रभू नित भज रे मन तू भज रे
तो हात धरोनी भक्तीपंथा लावी रे।
सद्गुरु प्रभू नित भज रे मन तू भज रे
तो पाऊल चुकता पडता मार्गी सावरि रे।
सद्गुरु प्रभू नित भज रे मन तू भज रे
तो अंतर प्रेमे भरुनी वाहवी रे।
सद्गुरु प्रभू नित भज रे मन तू भज रे
तो जीवन आनंदाने भरी रे।
सद्गुरु प्रभू नित भज रे मन तू भज रे
तो राम कृष्ण दत्त सगुणरूपे रे।
सद्गुरु प्रभू नित भज रे मन तू भज रे
तो परमानंद अभंग प्रत्यक्षची रे।