अनुदिनी by Indraneel

अनुदिनी by Indraneel

By Indraneel poleScienceArts
Download on the App Store

अनुदिनी by Indraneel episodes

  • Beyond दुकानदारी: भारतीय Manufacturing चे भविष्य

    पियुष गोयल म्हणले "दुकानदारी करनी है?" आणि भारतीय स्टार्टअप्स मालकांनी गदारोळ केला. अर्थात त्यांचंही काही चुकीचं नाहीये. कितीही Ease of doing business म्हणलं तरी भारतीय नोकरशाही आणि एकूणच राजकीय वातावरण हे व्यवसायाला किती पूरक आहे याबद्दल माझ्यामनात बरेच प्रश्न आहेत. महत्वाचं म्हणजे आपण चायना बरोबर तुलना करताना चायनाने गेली वीस तीस वर्षं उत्पादन क्षेत्रात जो बेस तयार केला आहे त्याच्याशी आपण कसे स्पर्धा करणार आहोत? उत्पादन क्षेत्रात संधी आहेत का ? कशा आणि कुठे ? या आणि अश्या बऱ्याच प्रश्नांवर बोलायला मी राजेश सरांना पॉडकास्टवर यायची विनंती केली आणि त्यांनीही अतिशय संयमाने माझ्या बाळबोध प्रश्नांना उत्तरं दिली.

    अनुदिनीच्या पुढच्या भागात मी गप्पा मारतोय राजेश मंडलिक यांच्याबरोबर.



    This is a public episode. If you would like to discuss this with other subscribers or get access to bonus episodes, visit indraneelpole.substack.com
    1 hr 1 min
  • Ghibilification with Chinmay Bhave

    सो घीबीली वगैरे काय हे आत्तापर्यन्त तुम्हाला कळलं असेलच. नसेल, तर लग्गेच ChatGPT ला विचारून या आणि मग हा पॉडकास्ट ऐका. आज मी चिन्मय भावे बरोबर गप्पा मारतोय. चिन्मय ने डिझाईन या विषयात IIT मुंबई मधून पदव्युत्तर शिक्षण घेतलेलं आहे आणि गेली बरीच वर्ष तो डिझाईन रिसर्चर म्हणून काम करतो. AI आर्ट आणि त्याच्या अनुषंगाने येणारे मॉरल प्रश्न यावर तर आम्ही चर्चा केलेली आहेच. पण त्यापुढे जाऊन एकूणच त्याच्या क्षेत्रात AI चा वापर, फायदा तोटा वगैरेवर पण चिन्मय ने भरपूर चांगले मुद्दे मांडले आहेत. आपापल्या क्षेत्रात AI चा वापर करण्याच्या काय काय संधी असू शकतात हे जाणून घ्यायचं असेल तर हा पॉडकास्ट नक्की ऐका.



    This is a public episode. If you would like to discuss this with other subscribers or get access to bonus episodes, visit indraneelpole.substack.com
    1 hr 10 min
  • Grok है या Woke है?

    Grok आलाय, आणि लोकांना वाटतंय की तो Truth seeker, philosopher आणि Fact checker आहे! जणू काय, देवानेच पृथ्वीवर पाठवलेला AI अवतार!

    पण खरंच असं आहे का? Grok खरंच तथ्य पडताळतोय की फक्त आत्मविश्वासाने अंदाज बांधतोय? लोक त्याला का Ultimate Fact Checker समजतात? आणि सगळ्यात महत्त्वाचं – का आपण त्याला इतकं गंभीरपणे घेतोय?

    या पॉडकास्टमध्ये आपण पाहणार आहोत Grokच्या "ज्ञानसागराच्या" खोलीचा अंदाज आणि त्याच्या मर्यादा!



    This is a public episode. If you would like to discuss this with other subscribers or get access to bonus episodes, visit indraneelpole.substack.com
    33 min
  • Deepfake म्हणजे नक्की काय? - गप्पा टप्पा विथ मंगेश वाघ

    मी मंगेशचा चतुरंग मध्ये Deepfake वर लेख वाचला आणि मनात आलं कि याच्याशी गप्पा मारायला मजा येईल. मंगेश आणि मी फेसबुकवर कनेक्टेड नव्हतो. मग अदिती खरेला मेसेज केला नंबर मागायला.

    Deepfake बद्दल बरेच प्रश्न आणि फार कमी उत्तरं असा एकूण प्रकार आहे. रश्मीका मंदाना, ओबामा, निकी मिनाज वगैरेंचे डीपफेक फार फेमस झाले, पण त्याशिवायही टिक टॉक इंस्टाग्रामवर बघितलं तर कितीतरी डीपफेक व्हिडियो दिसतातच. टॉम क्रूझचा तर एक झाडू मारणारा व्हिडियो टिकटॉकवर मी इतक्यात बघितला तो इतका रिऍलिस्टिक होता कि विचारू नका. खरं तर मॉर्फिंग आपण गेले २० वर्ष वगैरे बघतोय, मग डीपफेकमध्ये असं काय वेगळं आहे? नेमकं काय आहे डीपफेक? अँड इज इट एज डेन्जरस एज इट साऊंड्स? मंगेश भारतात एका आय टी कंपनीत COO पदावर आहे, त्याचबरोबर तो मराठी सोशल मीडिया संमेलनांचा संस्थापक आणि रेस्पॉन्सिबल नेटिझम या संस्थेचा सदस्य आहे. मंगेश बरोबर या विषयावर गप्पा मारायला मला खूप मजा आली. तुम्हीही ऐका आणि सांगा.



    This is a public episode. If you would like to discuss this with other subscribers or get access to bonus episodes, visit indraneelpole.substack.com
    1 hr 1 min
  • OpenAI, Gen AI चे भविष्य काय?

    OpenAI आणि Sam Altman चा जो हाय वोल्टेज ड्रामा शनिवार रविवारी घडला ती वन्स इन अ डेकेड घडणारी गोष्ट आहे. ॲपलने स्टीव्ह जॉब्सला १९८५ मध्ये बाहेरचा रस्ता दाखवला त्यानंतर तंत्रज्ञान जगात घडलेली ही माझ्याप्रमाणे एवढी मोठी पहिलीच घटना आहे. यावर विचार करताना जाणवलं कि मराठीत या सगळ्या घडामोडीवर काही फारशी भरीव चर्चा होताना दिसत नाहीए. आणि मला तर या विषयावर फार बोलायची खुमखुमी होती. मग अमित लिमयेंना मेसेज टाकला, ते पण शॉर्ट नोटीस वर पॉडकास्ट वर यायला तयार झाले. आणि त्यातून आला हा एपिसोड. पण या गप्पा OpenAI मध्ये सुरु असलेल्या इंटर्नल पॉलिटिक्सवर नाहीये. तर त्या त्याही पुढे जाऊन एकूणच AI विषयी आहेत. OpenAI चं पुढे काय होईल, Generative AI चं भविष्य काय आहे, कॉर्पोरेट्स आणि एंटरप्राइझेस या नवीन तंत्रज्ञानाकडे कुठल्या दृष्टीने बघतात. Doomer का Optimist? अश्या बऱ्याच विषयांना आम्ही दोघांनी हात घातला आहे. ऐका आणि सांगा तुम्हाला आवडतं आहे का ते.



    This is a public episode. If you would like to discuss this with other subscribers or get access to bonus episodes, visit indraneelpole.substack.com
    51 min
  • तुपाने अभिषेक झालेला परमेश्वराचा पुत्र (Podcast)

    गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या कन्टेन्ट ग्रहण करण्याच्या सवयी आमूलाग्र बदलेल्या आहेत. लोकांचा अटेन्शन स्पॅन तर कमी झालेलाच आहे, त्याच बरोबर वाचन हा प्रकार मुख्यधारेतून काहीसा नीश या प्रकाराकडे सरकतो आहे असं मला वाटतं. मी इथे फेसबुकवर, ब्लॉगमध्ये, माझ्या न्यूजलेटरमध्ये किंवा अगदी मासिक, साप्ताहिक, वर्तमानपत्रांमध्ये लिहितो असं जेव्हा म्हणतो लिहिणं हा शब्द किमान माझ्याबाबतीत तरी सवयीतून आलेला आहे. हाताने कागदावर लिहिणे ही क्रिया मी गेले कित्येक वर्ष केलेली नाही. माझं लिखाण हे सहसा टंकन असतं. बरेचदा मी टेक्स्ट टू स्पीच वापरतो. माझ्या मनात माझी प्रतिमा लेखक अशी आहे का? (काय पण कॉन्फिडन्स) तर नाही, माझ्या डोक्यात मी स्टोरीटेलर आहे. मग ती मी कुठल्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचवतो हे माझ्यासाठी तुलनेने दुय्यम आहे. मला गेला काही काळ असं सतत वाटतं कि आपण लेखनाबरोबरच श्राव्य / ऑडियो माध्यम सुद्धा वापरलं पाहिजे. म्हणूनच मी माझ्या न्यूजलेटरवर लिहीत असलेले लेख/स्फुट मी ऑडियो किंवा पॉडकास्टच्या रूपात सुद्धा प्रसारित करायचा विचार करतोय. मागच्या आठवड्यात लिहिलेला "तुपाने अभिषेक झालेला परमेश्वराचा पुत्र" हा लेख म्हणूनच आज पॉडकास्टच्या रूपात मी माझ्या न्यूजलेटरवर टाकलेला आहे. तुम्ही लेख आधी वाचला असेल तर याकडे दुर्लक्ष करू शकता. तुम्हाला काम करता करता, ड्राइव्ह करताना, दुसऱ्या एखाद्या गोष्टीत गुंतलेलं असताना विविध शब्दांच्या चित्तरकथा ऐकायच्या असतील, तर हा पॉडकास्ट तुमच्यासाठी आहे.तसेच तुम्ही पॉडकास्ट ऍप वापरत असाल तर स्पॉटीफाय, गूगल पॉडकास्ट, ऍपल पॉडकास्टवर तुम्ही अनुदिनी नावाने हा पॉडकास्ट सर्च करू शकता.



    This is a public episode. If you would like to discuss this with other subscribers or get access to bonus episodes, visit indraneelpole.substack.com
    27 min
  • ChatGPT आणि गप्पा टप्पा with अभिराम आणि इंद्रनील

    सध्या कुठल्याही ऑनलाईन चर्चेला पॉडकास्ट म्हणायची फॅशन आहे म्हणून पॉडकास्ट, नाहीतर ह्या मी आणि अभिरामने मारलेल्या गप्पा आहेत. ChatGPT हे एकदमच हाइप झालेलं प्रॉडक्ट नेमकं काय करतं, ए आय, मशीन लर्निंग वगैरे वगैरे हा या गप्पांचा विषय..

    ऑडियो क्वालिटी जरा डाऊन आहे तर हेडफोन्स वापरणे.

    .

    .

    .

    ChatGPT आणि गप्पा टप्पा with अभिराम आणि इंद्रनील



    This is a public episode. If you would like to discuss this with other subscribers or get access to bonus episodes, visit indraneelpole.substack.com
    27 min

About अनुदिनी by Indraneel

From the publisher's feed

Culture, Politics, Philosophy, Technology

indraneelpole.substack.com